Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra local body elections: महिला बनणार ठाणेदार! भाजपा, शिंदेसेना, पवार गटाला धक्का

राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या. ठाण्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण- महिला तसंच सर्वसाधारण अशा प्रवर्गांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2025 | 12:22 PM
महिला बनणार ठाणेदार! भाजपा, शिंदेसेना, पवार गटाला धक्का

महिला बनणार ठाणेदार! भाजपा, शिंदेसेना, पवार गटाला धक्का

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीमध्ये सर्व दिग्गजांना वेगळा प्रभाग निवडावा लागणार
  • तिकीट मिळवताना चांगलीच कसरत करावी लागणार
  • दिग्गज माजी नगरसेवकांना मात्र आरक्षणाचा फाटका

Maharashtra local body elections News in Marathi: ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (11 नोव्हेंबर) आरक्षण जाहीर झाले असून त्यात फारसे बदल झाले नसले तरी काही दिग्गज माजी नगरसेवकांना मात्र आरक्षणाचा फाटका आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांच्यासह भाजप, शिंदेची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील काही दिग्गजांना या आरक्षणाचा फटका बसल्याने निवडणुकीमध्ये एकतर या सर्व दिग्गजांना वेगळा प्रभाग निवडावा लागणार आहे. तसेच तिकीट मिळवताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान ठाणे महापालिकेवर ६६ जागांवर महिला नगरसेविका निवडणून जाणार असल्याने ठाणे महापालिकेवर महिला राज येणार असल्याचे आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (ह) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता मंगळवारी सोडत काढण्यात आली. राम गणेश गडकरी रंगायतन येथे मंगळवारी (12 नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीला सुरवात झाली. या आरक्षण सोडतीत अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. परंतु काही मोजक्या मात्र महत्त्वाच्या दिग्गजांना यात फटका बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रभाग 1 क्रमांकमध्ये साधना जोशी शिंदे सेनेच्या माजी नगरसेविकेला आरक्षणाचा फटका बसला आहे. याठिकाणी अनुसुचित जमाती पुरुष आरक्षण आले आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक दोन मध्येही भाजाच्या कविता पाटील यांना फटका बसला आहे. नागरीकांचा मागस प्रवर्ग पुरुषांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे त्यांना याठिकाणी कदाचित आपल्या घरातील कोणालातरी लढवावे लागणार आहे.

 मिरा भाईंदर मनपा निवडणुकीत ‘महिला राज’! ९५ पैकी तब्बल ४८ जागा महिलांसाठी राखीव

माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनाही फटका

प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिंदे सेनेचे मधुकर पावशे यांना फटका बसला आहे. तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनाही फटका बसला असला तरी त्या बाजूच्या वॉर्डातून लढू शकणार आहेत. येऊरला देखील शिंदेसेनेचे नरेंद्र सुरकर यांचा बॉर्ड महिलेला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी देखील त्यांना पर्याय शोधावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये राष्ट्रवादीचे दिंगबर ठाकूर आता शिंदे सेनेत असून त्यांना फटका बसला असून येथे महिला आरक्षण पडले आहे.

देवराम भोईर यांच्यासमोरही प्रश्न

प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिंदे सेनेचे जुने माजी नगरसेवक देवराम भोईर यांना देखील आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. आता त्यांनी पर्याय वॉर्ड शोधावा लागणार आहे. या कुटुंबातील सदस्यांची अदलाबदल करून वॉर्ड मिळावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक १० अ हून मागील कित्येक वर्ष अजित पवार गटाचे दिग्गज समजले जाणार नजीब मुल्ला यांना देखील फटका बसला आहे.परंतु त्यांना अन्य वॉर्डातून लढण्याची संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये दिपा गावंड यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे.

भाजपाची मोठी दमछाक

याच प्रभागात कृष्णा पाटील यांच्या पत्नी नंदा पाटील आणि मिलिंद पाटणकर देखीत आहेत, परंतु आता पाटील यांच्या भावाने देखील तिकीट मागितले आहे. त्यामुळे या प्रभागातून आता तिकीट देतांना भाजपाची मोठी दमछाक होणार आहे. प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये भाजपाच्या सुर्वण कांबळे यांच्यासह ब वार्डातील एकनाथ भोईर यांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यांनी तर महापौर पदाचे स्वप्न पाहिले होते. परंतु आता त्यांना आजूबाजूचा पर्याय देखील नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते कोणता पर्याय निवडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 16 अ मध्ये मनीषा कांबळे यांना तर 22 अ मध्ये भाजपाचे सुनील हंडोरे यांना फटका बसला आहे. दिव्याचा विचार केल्यास राष्ट्रवादीतून शिंदे सेनेत गेलेल्या प्रभाग 29 अ मधील बाबाजी पाटील यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे.

शिक्षकांची रवानगी निवडणूक कामासाठी, पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कचाट्यात शिक्षकांची कुचंबणा!

मुंब्यात आव्हाडांच्या निकटवर्तीयांना धक्का

शरद पवार गटाचे खंद्दे समर्थक मानले जाणारे शाणु पठाण यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे. ३२ क मधून ते मागील वेळेस निवडून आले होते. परंतु आता हा वॉर्ड महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना आता आपल्या मुलीला संधी द्यावी लागणार असल्याचे दिसत आहे.

 

Web Title: Thane election news marathi a woman to become police commissioner a shock to bjp shinde sena and pawar factions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Election
  • Maharashtra Local Body Election
  • thane

संबंधित बातम्या

Ratnagiri News: चिपळूणमध्ये महायुतीऐवजी युती? बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावळले…
1

Ratnagiri News: चिपळूणमध्ये महायुतीऐवजी युती? बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावळले…

Mira Bhayandar Election Reservation: मिरा भाईंदर मनपा निवडणुकीत ‘महिला राज’! ९५ पैकी तब्बल ४८ जागा महिलांसाठी राखीव
2

Mira Bhayandar Election Reservation: मिरा भाईंदर मनपा निवडणुकीत ‘महिला राज’! ९५ पैकी तब्बल ४८ जागा महिलांसाठी राखीव

शिक्षकांची रवानगी निवडणूक कामासाठी, पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कचाट्यात शिक्षकांची कुचंबणा!
3

शिक्षकांची रवानगी निवडणूक कामासाठी, पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कचाट्यात शिक्षकांची कुचंबणा!

Maharashtra Local Body Elections: सोलापूर महानगरपालिकेचे बहुप्रतिक्षित आरक्षण जाहीर; इच्छुकांची ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी अवस्था
4

Maharashtra Local Body Elections: सोलापूर महानगरपालिकेचे बहुप्रतिक्षित आरक्षण जाहीर; इच्छुकांची ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी अवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.