मिरा भाईंदर मनपा निवडणुकीत 'महिला राज'! (Photo Credit - X)
भाईंदर: मिरा भाईंदर महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली त्यात प्रामुख्याने महिला राज यांना योग दर्शवण्यात आले महिलांना ४८ जागा आरक्षित करण्यात आल्या. मिरा भाईंदर मध्ये एका प्रभागामध्ये दोन महिला असे दर्शविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, यंदाही शालेय विद्यार्थ्यांद्वारे ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
महापालिकेचा कार्यकाळ २७ ऑगस्ट २०२२ रोजी संपुष्टात आली असून, तेव्हापासून प्रशासक राजवट सुरू आहे, मागील निवडणूक ऑगस्ट २०१७ मध्ये झाली होती. तर आरक्षण सोडत कार्यक्रम मिरारोडच्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह पहिला मजला येथे संपन्न झाला. तर यावर कोणाला हरकती सूचना असतील त्यांनी १७ नोव्हेंबर दुपारी पर्यंत महापालिका मुख्यालयात सादर कराव्यात असे पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या ९५ आहे. यापैकी महिलांसाठी ४८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी (एससी) ४ प्रभाग मध्ये चार जागा आरक्षित आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) १ जागा एका प्रभागात आरक्षित आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी २५ प्रभागात जागा आरक्षित आहेत. सर्वसाधारण सदस्यांची संख्या ६५ असून, त्यापैकी ३३ महिलांसाठी राखीव आहेत.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या चार असून त्यात प्रभाग क्रं. ११ अ, १३ अ, १४ अ, १८ अ, यांचा समावेश आहे. यापैकी ११ अ व १४ अ हे प्रभागात दोन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) एक प्रभाग आरक्षित आहे, यामध्ये प्रभाग क्रमांक १४ ब मध्ये एक जागा (महिला/पुरुष ) यांचा समावेश आहे.
नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी एकूण २४ प्रभागात २५ जागा आरक्षित आहेत. यामध्ये १ ते २४ मध्ये प्रत्येकी १ जागा व प्रभाग ४ मध्ये २ जागा आरक्षित आहेत, त्यातील १३ जागा महिलांसाठी राखीव व १२ जागा (महिला/पुरुष) असे असणार आहेत, यातील प्रभाग १ अ, ३ अ, ४ अ, ५ अ, ६ अ, ८ अ, ११ ब, १३ ब, १४ ब, १८ ब, २० अ, २१ अ व २३ अ अश्या महिलांसाठी १३ जागा आरक्षित आहेत व प्रभाग क्रं. २ अ, ४ ब, ७अ, ९ अ , १० अ, १२ अ, १५ अ, १६ अ, १७ अ, १९ अ, २२ अ व २४ अ असे (महिला/पुरुष) यांचा समावेश आहे.
महापालिकेत सर्वसाधारण (ओपन) साठी ६५ जागा आरक्षित आहेत, त्यातील महिलांना ३३ जागा ३२ (महिला / पुरुष) असे आहेत, महिलांना आरक्षित केलेले प्रभाग १ ब, ३ ब, ४ क, ५ ब, ६ ब, ८ ब, १३ क, १८ क, २० ब, २१ ब, २३ ब, मध्ये प्रत्येकी एक व प्रभाग २ ब व क, ७ ब व क, ९ ब व क, १० ब व क, १२ ब व क, १५ ब व क, १६ ब व क, १७ ब व क, १९ ब व क, २२ ब व क, २४ ब व क मध्ये प्रत्येकी प्रभाग २ महिला आरक्षित आहेत. तर (महिला/पुरुष) सर्वसाधारण असे ३२ जागा आरक्षित आहेत, त्यातील १ क व ड, ३ क व ड, ५ क व ड, ६ क व ड, ८ क व ड, ११ क व ड, २० क व ड, २१ क व ड, २३ क व ड मध्ये दोन जागा व २ ड, ४ ड, ७ ड, ९ ड, १० ड, १२ ड, १३ ड, १४ ड, १५ ड, १६ ड, १७ ड, १८ ड, १९ ड, २२ ड मध्ये आरक्षित आहेत.
मिरा भाईंदर महानगरपालिकेची २०११ च्या जनगणेनुसार ८ लाख ९ हजार ३७८ लोकसंख्या आहे त्यात ३०,२४३ अनुसूचित जाती व १२,५९६ अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. शहरात एकूण २४ प्रभाग आहेत त्यात ४ सदस्य असलेले २३ प्रभाग व ३ सदस्य असलेला १ प्रभाग आहे. त्यात एकूण ९५ सदस्य संख्या असून त्यातील ३० जागांवर आरक्षण आहे. त्यात २५ जागेवर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), ४ जागा अनुसूचित जाती, १ जागा अनुसूचित जमाती व सर्वसाधारण (ओपन ) ६५ जागा असणार आहेत. यातील एकूण पैकी ४८ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहे, त्यात महिलांसाठी अनुसूचित जमातीच्या २ जागा, १३ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) असे एकूण १५ जागा आरक्षित असणार आहे, व महिला आरक्षित ३३ सर्वसाधारण (ओपन) जागा आहेत. अशी माहिती सचिव दिनेश कानगुडे यांनी दिली आहे, यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त सचिन बांगर, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, सहाय्यक आयुक्त योगेश गुणिजन सह कर्मचारी आणि सर्वच पक्षाचे राजकीय पदाधिकारी नेते उपस्थित होते.






