Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : आषाढी एकादशीला लागलं गालबोट; MICL परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था, नागरिकांनी केलं आंदोलन

संपूर्ण महाराष्ट्रात आज आषाढी एकादशीचे पावन पर्व भक्तिमय वातावरणात साजरे होत असतानाच, मीरा-भाईंदर शहरात मात्र भलतेच दृश्य पाहायला मिळाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 06, 2025 | 03:37 PM
Thane News : आषाढी एकादशीला लागलं गालबोट; MICL परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था, नागरिकांनी केलं आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

मीरा-भाईंदर/ विजय काते : संपूर्ण महाराष्ट्रात आज आषाढी एकादशीचे पावन पर्व भक्तिमय वातावरणात साजरे होत असतानाच, मीरा-भाईंदर शहरात मात्र भलतेच दृश्य पाहायला मिळाले. पारंपरिक रितीरिवाज, भजन, कीर्तन, रांगोळ्यांनी सजलेले रस्ते आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’चा गजर हे दृश्य महाराष्ट्रात सर्वत्र दिसत असतानाच, इथे मात्र नागरिकांनी भक्तीऐवजी संताप व्यक्त केला आहे. याचं कारण म्हणजे श्याम उपवनजवळील MICL परिसरातील अत्यंत खराब अवस्थेतील मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था.

चिखलमय रस्त्यावरून संतप्त नागरिकांचा संतापाचा झोत

ठाकूर मॉलच्या मागील भागातील एका बांधकाम प्रकल्पातून निघणारा चिखल थेट रस्त्यावर वाहत असल्यामुळे या मार्गाची स्थिती अक्षरशः दलदलीसारखी झाली आहे. या रस्त्याचा रोज वापर करणाऱ्या शेकडो रहिवाशांना आणि दुचाकीस्वारांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे रस्ता निसरडा झाल्यामुळे अनेक किरकोळ अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. रस्त्याचा वापर करणाऱ्या वृद्ध, महिला, लहान मुले आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा फार मोठा फटका बसत आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी निषेध आंदोलन; ‘भक्ती नव्हे, संताप’

या अडथळ्यांमुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्त्यावरच आंदोलन केलं. “सण आला तरी समस्या नाहीत सुटत, पायाखालचा रस्ता सुद्धा आमच्याकडे चांगला नाही,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. “दरवर्षी कर भरा, पण मूलभूत सुविधा मात्र मिळत नाहीत,” अशी तीव्र नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाच्या दुर्लक्षावर रोष; तात्काळ उपाययोजनेची मागणी

रहिवाशांचा आरोप आहे की, अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका प्रशासन आणि संबंधित बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. शिवसेना शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर तात्काळ रस्त्याचे डांबरीकरण आणि सांडपाण्याची व्यवस्था केली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.

‘स्मार्ट सिटी’चा दावा फोल – स्थानिक नागरिक

एका रहिवाशाने स्पष्टपणे सांगितले, “एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जाते, तर दुसरीकडे मूलभूत रस्तेच नाहीत. MICLसारख्या पॉश टॉवरसमोरच ही अवस्था असेल तर इतर भागांची कल्पनाच न केलेली बरी!”

काय आहेत नागरिकांच्या मागण्या ?

  • बांधकाम साईटवरून वाहणारा चिखल थांबवण्यासाठी योग्य जलनिचरा व्यवस्था.
  • वारंवार होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना आणि सीसीटीव्ही बसवणे.
  • महापालिकेच्या अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांवर जबाबदारी निश्चित करणे.
मीरा-भाईंदरसारख्या विकसित होत असलेल्या उपनगरात देखील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं हे निश्चितच चिंतेचं कारण आहे. एकीकडे आषाढी एकादशीसारखा पवित्र दिवस, तर दुसरीकडे पायाखालचा रस्ता देखील सुरक्षित नाही – हे चित्र शहरी प्रशासनाच्या अपयशाचे आरसे आहे. प्रशासनाने जर वेळेत जागे होऊन उपाययोजना केल्या नाहीत, तर रहिवाशांचा संताप आणखी वाढेल, हे निश्चित! या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तत्काळ पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Thane news ashadhi ekadashi in mira bhayandar was marred by chaos roads in micl area are in a pathetic condition citizens staged a protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi 2025
  • Marathi News
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार
1

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला  पाककला स्पर्धेचे खास आकर्षण
2

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
3

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध
4

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.