Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : महानगरपालिकेच्या आश्वासनाचे तीन तेरा; नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ‘आपला दवाखाना’ला टाळं

दिवा शहरातील ‘आपला दवाखाना’ हा ठाणे महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणारा महत्त्वाचा आरोग्य सेवा उपक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आला असल्याने नागरिकांनी प्रशासन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 08, 2025 | 03:04 PM
Thane News : महानगरपालिकेच्या आश्वासनाचे तीन तेरा; नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ‘आपला दवाखाना’ला टाळं
Follow Us
Close
Follow Us:
  • महानगरपालिकेची दिवा वासियांना पोकळ आश्ससनं
  • नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ‘आपला दवाखाना’ला टाळं
  • अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे:  पालिकेने नागरिकांच्या आरोग्यासाठी  काही उपक्रम राबविले होते. दिवा शहरातील ‘आपला दवाखाना’ हा ठाणे महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणारा महत्त्वाचा आरोग्य सेवा उपक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आला असून या निर्णयामुळे दिव्यातील पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्य हक्कावर गदा आली आहे. याआधीच फिरता दवाखाना बंद करून नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित करण्यात आले होते आणि आता ‘आपला दवाखाना’ही बंद करून महानगरपालिकेने स्वतः दिलेल्या लिखित आश्वासनाचे उल्लंघन केले आहे.

आरोग्य ही घटना प्रदत्त मूलभूत हक्कांपैकी एक असून राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जीवनाचा व आरोग्याचा हक्क अबाधित आहे. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम, 1949 आणि महाराष्ट्र नगरपालिकेचा कायदा यांनुसार ठाणे महानगरपालिकेवर नागरिकांना किमान आरोग्य सेवा पुरविण्याची वैधानिक जबाबदारी आहे. दिव्यातील नागरिकांकडून नियमित मालमत्ता कर व स्थानिक कर आकारले जात असूनसुद्धा आरोग्य सेवा न पुरविणे हे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग व नागरिकांच्या हक्कांचा भंग आहे. या निष्काळजी व बेकायदेशीर कृतीमुळे भारतीय दंड संहिता कलम 166, 269, 336 आणि 304A अंतर्गत जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला

दिव्यात स्थायी दवाखाना व २४x७ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होईपर्यंत ‘आपला दवाखाना’ अखंडित सुरू ठेवणे आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपत्कालीन सुविधा तसेच आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची तातडीची जबाबदारी आहे. अन्यथा दिव्यातील नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला राहील, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कल्याण – कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे शहर प्रमुख सचिन पाटील महिला शहर संघटिका ज्योती पाटील युवा सेना अधिकारी अभिषेक ठाकूर विभाग प्रमुख रवी रसाळ नागेश पवार आकाश विचारे विकी मंचेवार आदी उपस्थित होते.

Navi Mumbai : घरांच्या घोटाळ्याच्या आरोपांबाबत बैठक; दैनिक नवराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश

Web Title: Thane news citizens of diva are aggressive after thane municipal corporation closed the clinic without any prior notice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

Ratnagiri : मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठा संघर्ष! चोरी करून मानसिक छळ केल्याचा चेअरमनच्या बहिणीचा आरोप
1

Ratnagiri : मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठा संघर्ष! चोरी करून मानसिक छळ केल्याचा चेअरमनच्या बहिणीचा आरोप

Sangli News : सामाजिक कर्यकर्त्यांच्या दबावानंतर अतिक्रमणावर चालला हातोडा
2

Sangli News : सामाजिक कर्यकर्त्यांच्या दबावानंतर अतिक्रमणावर चालला हातोडा

मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा; 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार, मनसेचा आरोप
3

मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा; 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार, मनसेचा आरोप

CAT 2025 : एक शुल्लक चूकही पडू शकते महागात, परिक्षेला जाण्याआधी ‘या’ सोप्या टीप्स नक्की फॉल्लो करा
4

CAT 2025 : एक शुल्लक चूकही पडू शकते महागात, परिक्षेला जाण्याआधी ‘या’ सोप्या टीप्स नक्की फॉल्लो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.