Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क

गेले काही दिवस सततच्या सुुरु असलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अशी घटना पुन्हा होऊ शकते ही बाब लक्षात घेत पालिकेने आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन विभागाकडून सुरक्षा तैनात करण्यात येत आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 23, 2025 | 05:21 PM
Thane News : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : सलग तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने ठाणे शहरात अक्षरशः हाहाकार माजवला होता. शहरातील रस्ते पाण्याखाली गेले, गाड्या ठप्प झाल्या, घरांमध्ये गटाराचं पाणी शिरलं, झाडं कोसळून रस्ते अडले, त्याचबरोबर भिंती कोसळून जीवघेणे प्रसंग निर्माण झाले होते.  अवघ्या तीन दिवसांत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तब्बल 167 मदतीसाठी फोन खणखणले. मात्र संकटाच्या या काळात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिवस-रात्र सज्ज राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कामगिरी बजावली.

Maharashtra Rain News: ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालणार! कोकणासाह ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा अंदाज

पालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज 

गेले काही दिवस सततच्या सुुरु असलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अशी घटना पुन्हा होऊ शकते ही बाब लक्षात घेत पालिकेने आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन विभागाकडून सुरक्षा तैनात करण्यात येत आहे. 18,19 आणि 20ऑगस्ट या तीन दिवसांत आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तब्बल167 तक्रारी प्राप्त झाल्या. यात झाडं कोसळण्याच्या घटना सर्वाधिक होत्या.61 झाडं कोसळली, 15 फांद्या तुटल्या, 9 झाडं धोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आलं, तर एका प्रकरणात धोकादायक फांदी आढळली. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यामुळे 57 ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले.पावसाच्या जोरदार तडाख्याने 2 घरांच्या भिंती कोसळल्या,3 कंपाउंड वॉल ढासळल्या, नाल्याची भिंत कोसळली, एका ठिकाणी भूस्खलन झाले, लोखंडी शेड कोसळले. एवढ्यावरच न थांबता 4 आगीचे अपघात आणि प्लास्टर कोसळण्याचे प्रकरणही घडले. या सर्व तक्रारींवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तात्काळ प्रतिसाद दिला.

Thane News : ठाण्याचा प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत नोंदवा हरकती आणि सूचना

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीआरएफ, आर डी एम सी टीम, अग्निशमन दल, अभियंते, वृक्षप्राधिकरण विभाग, आरोग्य विभाग,घन कचरा विभाग, वाहतूक विभाग या सर्वांशी समन्वय साधून मदतकार्य राबवण्यात आलं. याचबरोबर महापालिकेच्या विविध विभागांनी नागरिकांशी संपर्क ठेवत, तक्रारींचं निवारण होईपर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे नागरिकांमध्येही प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला. पावसाचा प्रकोप काहीसा कमी झाला असला तरी प्रशासन अजूनही सज्ज आहे.धोकादायक इमारती, धोकादायक झाडं, धोकादायक भिंती यांची त्वरित माहिती द्यावी, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी आणि कोणतीही आपत्ती उद्भवल्यास तातडीने हेल्पलाईनवर संपर्क साधावा. ठाणे शहराच्या नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग नेहमी सज्ज आहे, असं यासीन एम. तडवी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ठाणे महापालिका यांनी सांगितलं आहे.

 

Web Title: Thane news municipal disaster management department on alert in the wake of heavy rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 05:21 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध
1

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद
2

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर
3

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास
4

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.