Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नव्या उपाययोजना; महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

काजू पाडा, चेना गाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 15, 2025 | 04:37 PM
Thane News : गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नव्या उपाययोजना; महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : काजू पाडा, चेना गाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी, रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यावर खडी टाकून, डांबराने ग्राऊटींग केल्यावरही हा रस्ता वारंवार उखडला जात आहे. त्यामुळे या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावते. वाहने उलट्या दिशेने येऊ लागतात. गर्दीच्या वेळी येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई-अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो. तसेच, मिरारोडपर्यंतही वाहनांचा खोळंबा होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली. त्यावर, या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्याने तेथे कोणतीही उपाययोजना टिकत नाही. मात्र, वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली. त्यासंदर्भात, पावसाळा असल्याने खड्डे भरताना रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा वापर करण्याची सूचना नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी केली.

रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा प्रयोग मीरा-भाईंदर महापालिकेने तत्काळ करून पाहावा. हे कॉंक्रिट कमीत कमी वेळात एकजीव होते. त्यामुळे रस्ता बंद न करता दुरुस्ती करणे शक्य होते. नागरिकांना घाट रस्त्याच्या स्थितीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर घाट परिसर लगेच त्याच पद्धतीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. उपलब्ध सर्व यंत्रणेचा वापर करून स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून चार तासांच्या अवधीत एखाद्या मार्गिकेवरील पट्ट्यात हा प्रयोग करावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, उपायुक्त दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मिरा-भाईंदर महापालिका, एमएमआरडीए, वन विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याच बैठकीत, घोडबंदर रस्त्यावरील सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता यांच्या एकत्रीकरणाचे काम पावसाळ्यामुळे थांबलेले आहे. काही ठिकाणी एकत्रीकरण झाले असले तरी मूळ रस्ता आणि नवीन रस्ता यांच्यात काही ठिकाणी अंतर पडले आहे. त्यामुळे संपूर्ण घोडबंदर रस्त्याची एमएमआरडीएने लगेच पाहणी करून आवश्यक तेथे रस्ता एकसमान करावा आणि दुरुस्ती करावी. त्याचबरोबर, सार्वजनिक बांधकाम विभागाने कासारवडवली सिग्नल, ओवळा सिग्नल, कापूरबावडी उड्डाणपूल येथील रस्त्याची दुरूस्ती तत्काळ पूर्ण करावी, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

Web Title: Thane news new measures for the repair of gaimukh ghat road instructions from municipal commissioner saurabh rao

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • Marathi News
  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

ठाण्यात नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, आमदार संजय केळकरांकडे तक्रार अन् पुढे…
1

ठाण्यात नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, आमदार संजय केळकरांकडे तक्रार अन् पुढे…

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर
2

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया
3

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
4

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.