
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी 'हे' दोन उमेदवार झाले बिनविरोध
प्रभाग ८-ड मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे यांच्या विरोधात एकही अर्ज शिल्लक न राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभाग १४-अ मध्येही राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज प्रक्रियेतच दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटात आनंदाचे वातावरण आहे.
पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद
दरम्यान, अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी झालेल्या माघारीनंतर निवडणूक लढतीचे चित्र काहीसे स्पष्ट झाले असून, उर्वरित उमेदवारांची संख्या ४७७ इतकी आहे. अपक्ष तसेच बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू असून, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची मनधरणी करण्यात येत होती. त्यामुळे उद्या अखेरच्या दिवशी किती अर्ज मागे घेतले जातात आणि आणखी कोणी बिनविरोध निवडून येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीदरम्यान मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी सांगितले की, केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून कुटुंबीयांच्या संपर्कात नाहीत.
विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने या उमेदवारांचे अपहरण करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त केला आहे. बेपत्ता उमेदवारांची नावे राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी असून, दोघेही प्रभाग १७ मधून उमेदवार आहेत.
या प्रकरणी मनसेचे पदाधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, पोलिसांकडे तातडीने तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.