Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा

दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळीवेळी विविध राजकीय पक्ष,घोडबंदर पट्ट्यातील नागरिक,खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 23, 2025 | 02:16 PM
Thane News : सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी; जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे / स्नेहा जाधव : दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळीवेळी विविध राजकीय पक्ष,घोडबंदर पट्ट्यातील नागरिक,खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी करत  आहे. मात्र  प्रशासन याबाबत हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अशावेळी सत्ताधाऱ्यांकडून महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मेट्रोमुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल असे चित्र उभे करत अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोची मोठा गाजावाजा करत चाचणी घेण्यात आली मात्र ही चाचणी नसून आगामी निवडणुकीसाठी केलेली चाचपणी असल्याचा आरोप काँग्रेस ने केला आहे.

मेट्रो ही कोकण महामार्गासारखी अद्यापपर्यंत रखडलेलीच

2012 साली केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो ची घोषणा करत मंजुरी दिली होती.त्यानंतर 2014 साली सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिगत मेट्रो ची हवेत उडणारी मेट्रो केली.तेव्हापासून हे काम रखडलेलेच आहे.

Marathwada Heavy Rainfall: शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर करावी; माजी मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

कामे अर्धवट… खर्चात मात्र कोट्यवधीने वाढ

चार वेळा दिलेल्या डेडलाइन उलटून देखील हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.मेट्रो मार्गिका पूर्ण नाही, काही ठिकाणी मेट्रोचे पिलर्स व त्यावर ट्रॅक उभारलेले नाही,कारशेड उभारणीचा अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला काम दिल्याने अद्यापपर्यंत न उभारलेले कारशेड ,कारशेडची उभारणीत स्थानिक आमदारांचा हस्तक्षेप त्यामुळे पळून गेलेली लोक, मेट्रो स्टेशन ची उभारणी नाही, इतर मेट्रो बोगींचे निर्माण कधी पूर्ण होणार ,टॉयलेट,तिकीट काउंटर,कॅफेटेरिया नाही तसेच मेट्रोच्या इतर चाचण्या, परवानग्या आणि इतर कामांसह पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार असतानाही गाजावाजा करत केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी मेट्रोची चाचणी घेतल्याचा आरोप ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.यावेळी ठाणे काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे,रवी कोळी देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, पण…; पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेवर शरद पवारांची प्रतिक्रीया

घोडबंदर सेवा रस्ता विलीनीकरणाचे काम तात्काळ थांबवा

काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्याने सेवा रस्त्याची मागणी लावून धरत केलेल्या आंदोलनानंतर ठाणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूस सर्विस रोड विकसित केले होते. घोडबंदर रोड येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द असल्याने त्या ठिकाणी सर्विस रोड महापालिकेला करता आला नाही परंतु सेवा रस्ता अस्तित्वात असल्याचे पकडून त्यावेळी बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. परंतु 2014 नंतर मेट्रो येत असल्याने बांधकाम परवानग्या देण्यात येऊ नये असे पत्र मेट्रो ने महापालिकेला दिले असतानाही नव्याने बांधकाम परवानग्या दिल्या तसेच मेट्रो चे पिलर सेवा रस्ता व घोडबंदर रस्ता त्याच्या मध्यभागी उभारल्याने एकत्रीकरणानंनंतर ते रस्त्याच्या मध्यभागी येणार असल्याने वाहतुकीला अडथळा ठरणार आहेत.

एकत्रिकरणानंतर अनेक जुनी गृह संकुले ही रस्त्यालगत येणार आहेत.यामुळे नागरिकांचा विरोध असतानाही घोडबंदर-सर्विस रोड एकत्रीकरणाचे काम सुरू आहे.जर हा सर्विस रोड पुर्वदुती महामार्गावर विलीनीकरण झाल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूस आठ ते दहा लाखाच्या वर असलेल्या लोकसंख्येस पर्यायी रस्ता नसल्याने भविष्यात हायवे जाम झाल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत फायर ब्रिगेड व ॲम्बुलन्स पोहचणार कशी ?त्यामुळे नागरिकांना विश्वासात न घेता सुरू असलेले सर्विस रोड एकत्रीकरणाचे काम तातडीने थांबवून वाहतूक कोंडीवर उपाययोजन कराव्यात व डिसेंबर अखेर मेट्रो चालू होणार असलेबाबत श्वेतपत्रिका काढावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करून जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

Web Title: Thane news ruling partys election probe in the name of metro congress warns of filing public interest litigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • metro 3
  • Nationalist Congress Party
  • Thane news

संबंधित बातम्या

‘केबिनमध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी जमिनीवर जाऊन कामं करा’; एकनाथ शिंदेंची त्यांच्याच मंत्र्यांच्या कामावर नाराजी
1

‘केबिनमध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी जमिनीवर जाऊन कामं करा’; एकनाथ शिंदेंची त्यांच्याच मंत्र्यांच्या कामावर नाराजी

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवार सकारात्मक; मोठा निर्णय घेणार?
2

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवार सकारात्मक; मोठा निर्णय घेणार?

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा
3

‘कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू’; शशिकांत शिंदेंचा इशारा

Metro 3 चे बांधकाम पूर्ण, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयही जोडलं जाणार, कुठून आणि कसा असेल मार्ग?
4

Metro 3 चे बांधकाम पूर्ण, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयही जोडलं जाणार, कुठून आणि कसा असेल मार्ग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.