ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : घोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडीची समस्या आता वाढती डोकेदुखी ठरत आहे. याचपार्श्वभूमीवर परिसरातील रस्ता रुंदीकरणा प्रकल्प हाती घेण्यात येत होता, मात्र या रुंदीकरणास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
सर्व्हिसरोड सरसकट रुंदी करण्यास विरोध घोडबंदर भागातील जवळपास रहिवासी असोसिएशच्या प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते, त्या अनुषंगाने तेथील राहिवाशांचा सर्व्हिस रोड सरसकट रुंदीकरण करण्याबाबत विरोध असल्याचे दिसून आले आहे. याचापर्श्वभूमीवर स्थानिकांचं म्हणणं समजून घेत योग्य तो सुवर्णंमध्ये काढण्यासाठी ज ठाणे येथील शासकीय विश्राम गृह येथे आमदार संजय केळकर यांनी एमएमआडीए चे अधिकारी सुर्वे यांच्याशी बैठक घेतली .
स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे मेट्रोचे काम सुरू आहे पण ते काही काळासाठी आहे. वाहतूक कोंडीसाठी रस्ता रूंदीकरण हा उपाय तुमच्या दृष्टीने असला तरी, उपलब्ध रस्ता कालांतराने योग्य पध्दतीने उपलब्ध होऊ शकणार आहे.घोडबंदर रस्ता सेवा रस्त्यामध्ये घेणे हे कायदयाने चुकीचे असल्याचे मत आहे. कारण सेवा रस्त्यावरील आस्थापनांना त्यावेळीजी परवानगी दिली ती सेवा रस्ता करणेबाबतची हमी दिल्यामुळे दिली होती.सेवा रस्त्यामुळे रहिवासी, शाळकरी विद्यार्थी प्रवासी यांना सुरक्षा व सुविधा मिळत असते.
सेवा रस्ता काढल्यास थेट आस्थापनां कार्यालय व दुकाने याच्या द्वारासमोरूनच थेट वाहतूक येईल. तसेच मेट्रो स्थानकाचे जिने सुध्दा थेट त्यांच्या प्रवेशद्वारावर येतील.सर्व्हिस रोड विलिन करण्याआधी नागरीकांच्या सूचना आक्षेप मागवणे आवश्यक होते.
झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे. या रूंदीकरणाबाबत येथील अनेक गृहनिर्माण संस्थामधील रहिवाश्यांनी तीव्र आक्षेप घेण्याचं कारण म्हणजे, या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या प्राधिकरणाने कधीही चर्चा केली नाही, मला माहिती दिली नाही. याबाबत आपण नागरीकांच्या भावनांचा विचार करून चर्चा करूनच रुंदीकरणाबाबत कार्यवाही करावी अशी विनंती आमदार संजय केळकर यांनी केली आहे. या बैठकीला आमदार संजय केळकर MMRDA अधिकारी सुर्वे यांना केली. या वेळी घोडबंदर परिसरात राहणारे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे प्रशासन आता याबाबत काय ठोस भूमिका घेणार हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.