Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन सज्जतेची प्रभावी चाचणी

ठाण्यात "ऑपरेशन अभ्यास" मॉक ड्रिल यशस्वीरीत्या पार पडले असून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन व नागरिकांची सज्जता प्रभावी दिसून आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 11, 2025 | 09:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

स्नेहा जाधव, काकडे: ठाण्यातील लोढा अमारा, कोलशेत मैदानावर “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन 11 मे 2025 रोजी करण्यात आले. केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीतील सज्जतेचे परीक्षण करण्यासाठी हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते. दुपारी 4.30 वाजता सायरन वाजवून ड्रिलची सुरुवात झाली आणि पूर्वनियोजित घटनाक्रमानुसार संपूर्ण कार्यवाही पार पडली.

Mahayuti Government: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, अजित पवार मुख्यमंत्री होणार..? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

या मॉक ड्रिलमध्ये काल्पनिक एअर स्ट्राईक/बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी तातडीने सूचना प्रसारित करण्यात आल्या. नागरिकांनी कोणताही गोंधळ न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले. शोध मोहिमेद्वारे 40 जखमी व अडकलेल्या नागरिकांची सुटका करून त्यांना त्वरित प्रथमोपचार देण्यात आला. याशिवाय इमारतीत अडकलेल्या 5 जणांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

या मॉक ड्रिलचे निरीक्षण जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, विविध यंत्रणांचे अधिकारी, होमगार्ड, अग्निशमन दल, पोलीस व लोढा अमारा गृह संकुलातील सुरक्षा कर्मचारी यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग होता. मॉक ड्रिलदरम्यान कोणतीही अफवा पसरली नाही आणि नागरिकांचा प्रतिसाद सकारात्मक राहिला. प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांनी नागरिकांना ही केवळ तयारीची चाचणी असल्याचे सांगत सहकार्याबद्दल आभार मानले.

सोलापूरमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन; तब्बल 27 हजार 320 प्रकरणे सामंजस्याने काढली निकाली

या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपायुक्त प्रणाली घोंगे, मुख्य अग्निशमन अधिकारी निलेश झलके, ममता डिसूझा, डॉ. अनिता जवंजाळ आदी अधिकारी उपस्थित होते. या मॉक ड्रिलमधून प्रशासन आणि नागरिक दोघेही आपत्कालीन परिस्थितीला सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Thane operation abhyas mock drill successful 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Mock Drill
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
2

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
3

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त
4

Thane Crime: इंस्टाग्राम ‘रीलस्टार’कडून उच्च शिक्षित तरुणींची फसवणूक; 37 लाखांचे दागिने, BMW आणि आयफोन जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.