Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

Mumbai Heatwave : शुक्रवारी मुंबई व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात उष्ण वातावरण असणार असून घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 08, 2026 | 07:53 PM
Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
  • तापमान 35 अंशांजवळ; उकाडा वाढणार
  • ठाणे-पालघरमध्येही उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज
पावसानं दडी मारल्यानंतर राज्यातील वातावरणात कमालीचा बदल पाहण्यास मिळत आहे. मान्सून गायब झाल्यानं तापमानात अचानक वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हंगामातील पहिली उष्णतेची लाट (Mumbai Heatwave) येण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून तापमान वाढण्याची शक्यता आहे.

ठाणे व पालघरलाही इशारा

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागातील काही निवडक भागांमध्ये नागरिकांना अत्यंत प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

हा ऑक्टोबर डोक्याला ताप देणार

मान्सून निघून गेल्याने महाराष्ट्राच्या हवामानाचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. वाढलेले तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे दुपारच्या वेळी उकाड्याचा त्रास वाढला असून नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे. राज्यातील बऱ्याच भागातील हवामान पूर्णपणे कोरडे पडले असून फक्त तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता उरल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. एकप्रकारे यंदाचा ऑक्टोबर महिना डोक्याला ताप देणार हे यातून निश्चित झाले आहे.

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

कोकणचा पारा वाढणार

सध्या मुंबईसह अनेक कोकणपट्ट्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचले आहे. स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांच्या मते, मान्सूनच्या परतीच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता अत्यंत नगण्य अशीच आहे. सध्या पाकिस्तान भागातून भारताच्या दिशेने पश्चिमी वाऱ्यांचे प्रवाह तयार होत आहेत, तर दक्षिण भारतात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अरबी समुद्र आणि लगतच्या परिसरातील वाऱ्यांच्या बदलत्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामान तयार झाले आहे. देशात एका बाजूला देशातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू असताना, दुसरीकडे, काही भागांत तीव्र उष्णतेची लाट अनुभवण्यास येत आहे. याशिवाय, झारखंड आणि बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्यामुळे हवामानाचा हा संपूर्ण पॅटर्न बदलल्याचे पाहण्यास मिळत आहे.

नागरिकांनी ही काळजी घ्या

भरपूर पाणी प्या : शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा फळांचा रस प्या.

दुपारचे ऊन टाळा : दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय थेट सूर्यप्रकाशात फिरणे टाळा.

पोशाख : घराबाहेर पडताना सुती (कॉटनचे) आणि हलक्या रंगाचे कपडे वापरा. तसेच डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा.

बालके आणि वृद्धांची काळजी : लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना उष्णतेचा त्रास लवकर होऊ शकतो, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या.

Web Title: Mumbai heatwave raigad yellow alert october weather update rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • maharashtra weather alert
  • raigad
  • thane

संबंधित बातम्या

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
1

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
2

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Raigad News: आश्रमशाळेच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप; चौकशीची मागणी जोर धरणार?
3

Raigad News: आश्रमशाळेच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप; चौकशीची मागणी जोर धरणार?

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
4

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.