ठाणे : सलग दुसऱ्या दिवशी ठाण्यात गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. माजिवडा येथील एका उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीने मद्याच्या अमलाखाली आपल्याच कुटुंबियांवर गोळीबार केला. परंतु सुदैवाने सगळे बचावले आहेत. एकीकडे काल नाश्ता दिला नाही म्हणून एका सासऱ्याने आपल्या सुनेची गोळी घालून हत्या केली तर दुसरीकडे घरगुती वादातून एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या आणि कालच्या ठाण्यातील या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे.
[read_also content=”‘असा’ रंगला आलिया – रणबीरचा मेहेंदी संगीत -सोहळा; फोटो होतायत व्हायरल https://www.navarashtra.com/movies/newly-married-alia-bhatt-shared-her-fabulous-mehendi-and-sangit-photos-nrak-269616.html”]
ठाण्यातील माजिवडा परिसरात असलेल्या लोढा लगझेरिया कॉमलेक्स मधील क्लेर्मोन्ट इमारतीच्या २३ व्या मजल्यावर राहणाऱ्या राजेश मोहनलाल शर्मा या ५१ वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या कुटुंबियांशी वाद घालण्यास सुरुवात केली. प्राप्त माहितीनुसार त्याचे तीनही मुलगे काहीही काम न करता वडिलांच्या पैश्यांवर अवलंबून असल्याने घरात वारंवार वाद होत असतात. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शर्मा यांनी आपल्या परवानाधारक पिस्तूलातून पाच गोळ्या झाडल्या. यात दोघांना किरकोळ जखमा झाल्या परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती कापूरबावडी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी दिली. पोलिसांनी आरोपी शर्मा याला ताब्यात घेतले असून त्याचे रि्व्हॉल्वर देखील जप्त करण्यात आले आहे. वरील दोन्ही घटनांमध्ये आरोपी हे अत्यंत सधन घरातील असून त्यांच्याकडे परवानधारक रि्व्हॉल्वर देखील होत्या हे महत्वाचे. या दोन्ही घटनांवरून परवाने असलेल्या रि्व्हॉल्वर धारकांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे एवढे मात्र नक्की.
[read_also content=”सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मिळाला ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती सुधारत असल्याची डॉक्टरांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/minister-dhananjay-munde-gets-discharge-from-breach-candy-hospital-nrsr-269614.html”]