Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel News: पनवेलमध्ये स्मशानातील राखेचं गूढ अखेर उकललं; नेमकं काय प्रकरण?

एक महिला राख उचलून नेत असल्याची माहिती समोर आली. राखेतील सोन शोधण्यासाठी राख नेली जात असल्याचा संशय असल्याची माहिती समोर येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2026 | 07:41 PM
पनवेलमध्ये स्मशानातील राखेचं गूढ अखेर उकललं; नेमकं काय प्रकरण? (फोटो सौजन्य-Gemini)

पनवेलमध्ये स्मशानातील राखेचं गूढ अखेर उकललं; नेमकं काय प्रकरण? (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:

पनवेल ग्रामीण : पालिका हद्दीतील काही स्मशानभूमींमधून राख चोरीला जात असल्याच्या तसेच स्मशान परिसरात अघोरी प्रकार होत असल्याच्या बातम्या दैनिक नवराष्ट्रमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरात चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणात एक वेगळी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालिका हद्दीतील काही स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारानंतर मोठ्या प्रमाणात राख पडून राहत असल्याने त्या राखेची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न तेथील कर्मचाऱ्यांसमोर निर्माण होत आहे.

याचा फायदा घेत एक महिला आपल्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन स्मशानातील ही राख उचलून नेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र संबंधित महिला ही राख नेमकी कशासाठी वापरते किंवा ती कुठे नेली जाते याबाबत स्मशानातील कर्मचाऱ्यांनाही कोणतीही ठोस माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी अंत्यसंस्कारावेळी राहिलेल्या दागिन्यांचे सूक्ष्म अंश अथवा सोने मिळवण्यासाठी राख चाळली जात असल्याच्या चर्चाही होत असल्याने या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.

karjat Panchayat Samiti सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे, तर उप सभापती पदावर चित्रा ठाकरे

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून स्मशानातील राखेची अधिकृत विल्हेवाट लावण्याबाबत पालिकेकडून कोणती व्यवस्था आहे का, तसेच ही राख नेण्यासाठी कोणाला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील देवपूर अमरधाम स्मशानभूमीतून राख चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. चोरी केलेल्या राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पनवेलमध्येही स्मशानातील राख उचलून नेली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संशय अधिक वाढला असून या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांची प्रतिक्रिया

स्मशानभूमी हा अत्यंत संवेदनशील विषय असून तेथील राख अशा प्रकारे उचलून नेली जात असल्याची माहिती समोर येणे चिंताजनक आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक संजय वाजत्री यांनी केली आहे.

पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष

स्मशानातील राखेची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून अधिकृत पद्धत काय आहे आणि या प्रकाराला कोणाची परवानगी आहे का, याबाबत पनवेल महानगरपालिकेने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अंत्यविधी वेळी सोन्याची प्रथा

भारतातील काही भागांमध्ये पारंपरिक श्रद्धेनुसार मृत व्यक्तीच्या तोंडात किंवा अंगावर सोने अथवा दागिन्यांचा छोटा तुकडा ठेवण्याची प्रथा असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी हे अंतिम संस्काराचा भाग मानले जाते. अंत्यसंस्कारानंतर जळालेल्या राखेत दागिन्यांचे सूक्ष्म अंश किंवा धातूचे कण राहू शकतात, अशीही चर्चा काही ठिकाणी केली जाते. त्यामुळे काही ठिकाणी राख चाळून धातूचे अंश मिळवण्याचे प्रकार घडत असल्याच्या घटना पूर्वी समोर आल्या आहेत.तथापि, पनवेलमधील प्रकरणात अशा प्रकाराशी कोणताही थेट संबंध असल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

धुळे कनेक्शन : राखेतून सोने मिळवण्यासाठी चोरीचा प्रकार

काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील देवपूर अमरधाम स्मशानभूमीतून राख चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारानंतर राखेत राहिलेल्या दागिन्यांचे सूक्ष्म अंश किंवा सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही राख चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.या घटनेमुळे धुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती आणि स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती.

स्मशानातील राख उचलून नेणारी महिला नेमकी कोण?

ती राख कुठे आणि कशासाठी नेली जाते?

यासाठी कोणाची अधिकृत परवानगी आहे का?

स्मशानातील राखेची विल्हेवाट लावण्याची पालिकेची पद्धत काय?

या प्रकाराची चौकशी होणार का?

Government Scheme: आता महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वक्तव्य

Web Title: The mystery of the ashes in the panvel crematorium was finally solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • maharashtra
  • panvel
  • thane

संबंधित बातम्या

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा….! महाराष्ट्र दिनानिमित्त नातेवाईक, मित्रमैत्रिणींना शेअर करा हटके शुभेच्छा
1

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा….! महाराष्ट्र दिनानिमित्त नातेवाईक, मित्रमैत्रिणींना शेअर करा हटके शुभेच्छा

Naman Tula Song : महाराष्ट्र दिनी गुंजणार अभिमानाची साद! अमृता फडणवीसांच्या मधुर सुरांनी रंगलं नवं गाणं
2

Naman Tula Song : महाराष्ट्र दिनी गुंजणार अभिमानाची साद! अमृता फडणवीसांच्या मधुर सुरांनी रंगलं नवं गाणं

Bhiwandi : पावसाळा तोंडावर आला तरी भिवंडीतील नाले तुंबलेलेच; महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप
3

Bhiwandi : पावसाळा तोंडावर आला तरी भिवंडीतील नाले तुंबलेलेच; महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप

Amravati News: ‘जीपीएस’ प्रयोगावर प्रश्नचिन्ह! धान वाहतुकीसाठी इंटरनेट सुविधेअभावी अडथळे
4

Amravati News: ‘जीपीएस’ प्रयोगावर प्रश्नचिन्ह! धान वाहतुकीसाठी इंटरनेट सुविधेअभावी अडथळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.