ठाणे : हरभरा चोरी करून खाल्याच्या संशयावरून दोन जणांनी एका निष्पाप मजुराला कुऱ्हाडीने मारहाण करण्याची घटना कल्याणात समोर आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे
कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या परिसरात एका कन्स्ट्रक्शन साईट वर काम करणारे दोन मजूर गंगा सिंग ,आणि त्याचा साथीदार हे हरभरा खात बसले होते. हे पाहुन त्यांच्याजवळ दोन जण आले. या दोघांना हरभरा खात असलेल्या मजुरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गंगा सिंग याने तुम्ही आम्हाला का मारताय अस विचारलं असता त्यांनी तू आमच्या शेतातील हरभरा कसा चोरला तुझी इतकी हिंम्मत कशी झाली अस म्हणत मारहाण केली. गंगा वारंवार त्यांना मी तुमच्या शेतातून हरभरे चोरले नसल्याचे सांगत होता मात्र मारहाण करणारे ऐकत नव्हते. इतक्यात मारहाण करणाऱ्या दोघा पैकी एकाने कुऱ्हाड उचलली व गंगावर हल्ला केला. याच दरम्यान गंगाचा साथीदार तेथून पळून गेला मात्र या हल्ल्यात गंगाच्या हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गंगा याने तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या नवनाथ लोखंडे व रोहित लोखंडे विरोधात गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे. क्षुल्लक कारणावरून मजुराला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
[read_also content=”ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट…गोल्डन मॅनने डायरक्टे फॉर्च्युनर मधून केली द्राक्ष विक्री https://www.navarashtra.com/maharashtra/golden-man-selling-grapes-in-kolhapur-nrvk-237644.html”]