Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : मानवी वस्तीत मगरीचा मुक्त संचार; मांडवी पाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबईच्या वेशीवर वसलेल्या मांडवी पाडा परिसरात खदानीच्या तलावात मगर दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 14, 2026 | 02:12 PM
Bhayander News : मानवी वस्तीत मगरीचा मुक्त संचार; मांडवी पाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Follow Us
Follow Us:
  • मानवी वस्तीत मगरीचा मुक्त संचार;
  • मांडवी पाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भाईंदर/ विजय काते : मुंबईच्या वेशीवर वसलेल्या मांडवी पाडा परिसरात खदानीच्या तलावात मगर दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेलगत असलेल्या या भागात मागील काही दिवसांपासून मगरीचा वावर आढळत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मांडवी पाडा हा भाग दहिसर पथकर नाक्यापासून काही अंतरावर असून येथील अनेक भूखंड खाजगी मालकीचे आहेत. काही वर्षांपूर्वी या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात दगडाच्या खदानी खोदण्यात आल्या होत्या. कालांतराने या खदानींमध्ये मोठे खड्डे तयार झाले आणि त्यामध्ये पावसाचे तसेच भूजलाचे पाणी साठू लागले. सध्या या खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्याचा वापर करून ते पाणी विक्री करण्याचा व्यवसाय काही ठिकाणी केला जात असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.
दरम्यान, अशाच एका खदानीच्या तलावात मागील काही दिवसांपासून एक मगर वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांनी या मगरीला तलावात पोहताना तसेच काठावर येताना पाहिल्याचा दावा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही मगर केवळ पाण्यातच मर्यादित न राहता कधी कधी तलावाबाहेर येऊन आसपासच्या परिसरातही फेरी मारताना दिसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे या भागातून पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

विशेष म्हणजे ज्या खदानीच्या तलावात मगर दिसत आहे, त्या परिसरात अनेक वर्षांपासून स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी जात असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या तलावात पोहणे किंवा पाण्यात खेळणे हा स्थानिक मुलांचा विरंगुळ्याचा भाग असतो. मात्र आता त्या तलावात मगर असल्याचे स्पष्ट झाल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. जर एखादे मूल किंवा नागरिक नकळत पाण्यात उतरले तर गंभीर घटना घडू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या तलावाकडे कोणताही नैसर्गिक नदी किंवा नाला थेट जोडलेला नाही. त्यामुळे येथे अचानक मगर कशी आली याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही नागरिकांच्या मते, पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहातून मगर येथे पोहोचली असावी, तर काहींच्या मते यामागे इतर काही कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या संदर्भात प्राणीप्रेमी सचिन जांभळे यांनी सांगितले की, “या भागात अचानक मगर दिसत असल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. परिसरात लहान मुले आणि नागरिक वारंवार ये-जा करत असतात. त्यामुळे वन विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन मगरीला सुरक्षितरित्या पकडण्याची कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते.”

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. घोडबंदर परिक्षेत्राचे वन क्षेत्र अधिकारी बागुल यांनी सांगितले की, “मांडवी पाडा परिसरातील खदानीच्या तलावात मगर असल्याची माहिती वन विभागाला मिळाली आहे. प्राथमिक पडताळणी करण्यात येत असून ही मगर खासगी तलावात असल्यामुळे तिला पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मात्र त्या परिसरात जाणे टाळावे.”
या घटनेमुळे मुंबईच्या वेशीवरच मगरीचा मुक्त संचार होत असल्याची बाब समोर आली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरात सूचना फलक लावणे, तसेच तलावाभोवती सुरक्षात्मक बंदोबस्त करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Web Title: Bhayander news free movement of crocodiles in human settlements atmosphere of fear among citizens in mandovi pada area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
1

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
3

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.