Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Bhiwandi Gang Rape Case: भिवंडीतील 22 वर्षीय विवाहितेवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणावरून काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी भाजपवर टीका केली आहे. माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांना अटक का झालेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 30, 2026 | 06:07 PM
भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • नरेंद्र पवार, शैलेश पाटील यांना अटक का नाही?
  • भिवंडी प्रकरणावरून काँग्रेसचा भाजपला सवाल
  • भिवंडी प्रकरणावर संध्या सव्वालाखेंची पत्रकार परिषदेत टीका
Bhiwandi Gang Rape Case: भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात 22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणात माजी भाजप आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिला बापगाव येथील एका फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नरेंद्र पवार यांनी हे आरोप फेटाळले असून, आपल्याला बदनाम करण्यासाठी कट रचल्याचा दावा केला आहे.

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

या पार्श्वभूमीवर संध्या सव्वालाखे यांनी, “एका पीडित महिलेच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही?” असा सवाल केला. तसेच या संपूर्ण प्रकरणावर भाजपच्या महिला पदाधिकारी भूमिका का मांडत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची माहिती समोर आणण्यात मदत करणाऱ्या काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांच्या सुरक्षेबाबतही सव्वालाखे यांनी चिंता व्यक्त केली. पीडित महिलेने 16 सप्टेंबर रोजी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्या तिला घेऊन पडघा पोलीस ठाण्यात गेल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे.

सव्वालाखे यांनी शैलेश पाटील याच्याबाबतही काही गंभीर आरोप केले. त्याच्या आईनेही माध्यमांसमोर येऊन मुलावर गंभीर आरोप करत कठोर शिक्षेची मागणी केली आहे. हे स्वतंत्र आरोप असून त्यांची सत्यता संबंधित तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होईल.

दरम्यान, भिवंडी सत्र न्यायालयाने नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने आरोप गंभीर असल्याचे नमूद करत प्रभावी तपासासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे म्हटले. संध्या सव्वालाखे यांनी या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रिया आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

Web Title: Bhiwandi alleged gang rape case congress sandhya sawwalakhe questions bjp over narendra pawar shailesh patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • bhiwandi
  • Congress

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
2

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

बुलेट ट्रेनसाठी भिवंडीत महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल तयार; ५४ हजारांहून अधिक बोल्टचा वापर
3

बुलेट ट्रेनसाठी भिवंडीत महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल तयार; ५४ हजारांहून अधिक बोल्टचा वापर

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
4

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.