Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees : एसटीतील कंत्राटी भरतीविरोधात एल्गार! श्रीरंग बरगे यांचा सरकारला थेट इशारा

ST Employees : एसटी महामंडळातील 17,742 चालक-वाहकांच्या प्रस्तावित कंत्राटी भरतीला महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने विरोध केला आहे. कायमस्वरूपी भरती न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा श्रीरंग बरगे यांनी दिला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 15, 2026 | 06:08 PM
ST Employees : एसटीतील कंत्राटी भरतीविरोधात एल्गार! श्रीरंग बरगे यांचा सरकारला थेट इशारा

ST Employees : एसटीतील कंत्राटी भरतीविरोधात एल्गार! श्रीरंग बरगे यांचा सरकारला थेट इशारा

Follow Us
Follow Us:
  • कंत्राटीकरण म्हणजे आधुनिक गुलामगिरी
  • 17,742 पदांच्या कंत्राटी भरतीवर सवाल
  •  कायमस्वरूपी भरती करा, अन्यथा आंदोलन
 

ST Employees : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (ST) प्रस्तावित कंत्राटी भरतीविरोधात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस आक्रमक झाली आहे. एसटी महामंडळात 17 हजार 742 चालक-वाहकांची कंत्राटी भरती करण्याऐवजी कायमस्वरूपी भरती करावी, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली.
सरकारने एसटीतील कायमस्वरूपी भरतीला परवानगी न दिल्यास क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बरगे बोलत होते. कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी विनोद वानखडे आणि धनंजय दुधाट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्य संघटनांमधून महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

कंत्राटीकरण म्हणजे आधुनिक गुलामगिरी

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात इंग्रज आणि सावकारांच्या शोषणाविरोधात संघर्ष उभा केला. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी त्यांनी संघटित होऊन लढण्याची प्रेरणा दिली. अन्यायाविरुद्ध स्वाभिमानाने लढण्याचा त्यांचा आदर्श आजही महत्त्वाचा आहे, असे बरगे म्हणाले.

आज एसटी कर्मचाऱ्यांसमोरही अन्यायाचे संकट उभे आहे. एसटी महामंडळातील कंत्राटीकरण म्हणजे आधुनिक गुलामगिरीच आहे. त्यामुळे या धोरणाला कर्मचाऱ्यांनी संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

 

17,742 पदांच्या कंत्राटी भरतीवर सवाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क संवर्गातील 16 हजार 717 पदांची कायमस्वरूपी भरती जाहीर केली आहे. तलाठी, लिपिक आणि कर सहायक अशा विविध पदांवर कायमस्वरूपी भरती केली जात आहे. मात्र, दुसरीकडे एसटी महामंडळात 17 हजार 742 चालक-वाहकांची कंत्राटी भरती करण्याची तयारी सुरू आहे. एका विभागात कायमस्वरूपी भरती आणि दुसऱ्या विभागात कंत्राटी भरती, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप बरगे यांनी केला.

रक्ताचा साठा उपलब्ध, तरीही रक्तघटकांसाठी प्रतीक्षा? रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन आणि प्रत्यक्ष पुरवठ्यातील तफावत तपासण्याची गरज

700 बस चालकांअभावी उभ्या

एसटी महामंडळात चालकांची 10 हजार 689 पदे रिक्त असल्याचा दावा बरगे यांनी केला. दापोडी कार्यशाळेत चालकांअभावी 700 बसेस उभ्या आहेत. त्यातच नव्या 8 हजार 300 बसेस दाखल होत आहेत. असे असतानाही सरकार कायमस्वरूपी भरतीला परवानगी देत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच एसटीचे 400 ते 500 चालक गेल्या पाच वर्षांपासून आरटीओच्या सेवेसाठी देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

एसटी चालकाच्या हातात एकाच वेळी 50 पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव असतो. अशा जबाबदारीच्या कामासाठी तीन वर्षांच्या कंत्राटावर अवघ्या 25 ते 30 हजार रुपये वेतनावर चालकांची नियुक्ती करणे म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यासारखे आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी किंवा वेतनाची शाश्वती नसते. अशा मानसिक तणावात चालकाने वाहन कसे चालवायचे, असा सवाल बरगे यांनी उपस्थित केला.

कायमस्वरूपी भरती करा, अन्यथा आंदोलन

निवृत्त कर्मचारी विनोद वानखडे आणि धनंजय दुधाट यांनी एसटीची अनेक वर्षे निष्ठेने सेवा केली. ऊन, पाऊस आणि सणवार अशा प्रत्येक परिस्थितीत त्यांनी प्रवाशांची सेवा केली. अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे हेच भगवान बिरसा मुंडा यांना खरे अभिवादन असल्याचे बरगे म्हणाले.

सरकारने गट-क संवर्गातील 16 हजार 717 पदे कायमस्वरूपी भरण्याचा निर्णय घेतला असेल, तर एसटीतील 17 हजार 742 पदांची कायमस्वरूपी भरती का केली जात नाही? एसटी कर्मचारी हा दुसऱ्या दर्जाचा नागरिक आहे का? असा सवाल त्यांनी केला. एसटीतील कंत्राटी भरती रद्द करून कायमस्वरूपी भरती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बरगे यांनी दिला.

यावेळी संघटनेचे अमरावती विभागाचे अध्यक्ष जयंत मुळे, विभागीय सचिव संदीप मुळे यांच्यासह प्रवीण चरपे, विकी यादव, शिवदास स्वर्गे, राम अजमिरे, रणजीत तायडे, प्रमोद दिपटे, पंकज पांडव, प्रमोद गोदे, मंगेश पोलाड, धीरज कच्चवे, मंगेश आगाशे, उमेश म्हस्के, रुपेश कोकाटे, संदीप कुबडे, पुरुषोत्तम मोकाशे, रोशन मडगे, चंद्रकांत पर्वत, मीनाक्षी पुडके, रंजना कोल्हारे, वृषाली वाघमारे, पूनम ठाकरे, शुभांगी सारवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: St employees contract recruitment opposition shrirang barge warning msrtc rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Congress
  • msrtc
  • Shrirang Barge

संबंधित बातम्या

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा
1

Amit Shah on Rahul Gandhi : राहुल गांधींनी भारताची बदनामी थांबवावी, पुढील 30 वर्षे सत्तेपासून दूर राहाल! अमित शाहांचा थेट इशारा

Kolhapur Politics: चंद्रकांत पाटलांना काँग्रेसचं खुलं आव्हान! पुणे सोडा, कोल्हापुरातून निवडणूक लढवा
2

Kolhapur Politics: चंद्रकांत पाटलांना काँग्रेसचं खुलं आव्हान! पुणे सोडा, कोल्हापुरातून निवडणूक लढवा

ST Bank: एसटी बँकेच्या अपघाती विमा पॉलिसीत गैरव्यवहाराचा संशय; ५.९६ कोटींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी!
3

ST Bank: एसटी बँकेच्या अपघाती विमा पॉलिसीत गैरव्यवहाराचा संशय; ५.९६ कोटींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी!

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं
4

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.