Dombivali News : "दुकान आणि हॉटेल व्यावसायिकांनी मुस्लिमांना कामावर ठेवू नका"; भाजप पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका
डोबिंवली : काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन निष्पापांचा मृत्यू झाला. आधी धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या. ज्या प्रकारे लोकांना गोळया घालून मारले गेले. ते पाहून आणि ऐकूणच देशात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. दशहतवाद्यांना आणि पाकिस्तानला लवकरात लवकर धडा शिकविला पाहिजे ही भावना प्रत्येक भारतीयांची आहे. भाजप कार्यकर्त्याकडून या घटनेनंतर मुस्लीमांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. दुकानं आणि हॉटेलमध्ये जाऊन मुस्लिम कामगारांना ठेवू नका असे आवाहन भाजपाने व्यावसायिकांना केले आहे. यामुळे एकूणच व्यावसायिक हैराण झाले.
डोंबिवलीतील एका व्यावसायिकावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बळजबरी केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमच्याकडे काम करीत असलेल्या सातही मुस्लीमांना लवकरात लवकर कामावरुन काढून टाका असा दम भाजप पदाधिकाऱ्याने डोंंबिवलीतील द्वारका हॉटेल व्यवस्थापनास दिला आहे. यावर काँग्रेस आणि मनसेने सकडून टिका केली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला हा प्रकार समोर आल्यावर काँग्रेस प्रदेश पदाधिकारी नवीन सिंह यांनी भाजपच्या या आवाहनाचा चांगलाच समाचार घेतला आहे. सिंह यांनी सांगितले,भाजपचे कार्यकर्ते उद्रेक करीत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत आहेत ते चुकीचे आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे थांबविले पाहिजे अशी मागणी केली आहे. तर मनसे नेते राजू पाटील यांनी देखील ट्वीट केले आहे की, जे घडले त्याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत.
लोकांनी हिंदू म्हणूनच हे सरकार निवडून दिले आहे ना ? मग देशातला हिंदू हा केवळ हिंदू आहे म्हणून मारला जातोय याची जबाबदारी कोण घेणार ? सुरक्षा यंत्रणांकडून खूप गंभीर चूक झाली आहे असं का बरं वाटत नाही आपल्याला ? जेव्हा हे घडल तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या ? सर्जिकल स्ट्राईक मोदी नी केली म्हणून सर्वांना सांगितला मग हा हल्ला कोणाच्या चुकीमुळे झाला ? ह्याचं उत्तर कोण देणार ? सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून आपली जबाबदारी झटकू शकत नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सरकारला कधीतरी द्यावीच लागतील. ते नराधम निष्पाप जीवांचे बळी घेताना धार्मिक शेरेबाजी करत आहेत व आपल्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत त्याअर्थी त्यांना हे पक्के माहित आहे की जे काम हजारो गोळ्या करू शकत नाहीत तेच काम तुमच्या आमच्या भावना भडकावून व धर्माचे विष कालवून ते सहज करू शकतात.