Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप

Dombivli News: डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील डी मार्टसमोरील कथित अनधिकृत रिक्षा स्टँडवर प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याचा आरोप झाला आहे. विरोध केल्यास दमदाटी केली जात असल्याची तक्रारही करण्यात आली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 24, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य-गुगल

फोटो सौजन्य-गुगल

Follow Us
Follow Us:
  • डी मार्टसमोरील कथित अनधिकृत रिक्षा स्टँडवर अवाजवी भाडे आकारल्याचा आरोप
  • अतिरिक्त भाड्याबाबत विचारणा केल्यावर उद्धट वागणूक दिल्याचा आरोप
  • ओला-उबर चालकांनाही परिसरात दमदाटी केली जात असल्याचे सांगण्यात आले
 

मानपाडा रोडवरील डी मार्टच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील कथित अनधिकृत रिक्षा स्टैंडवर रिक्षा चालकांकडून प्रवाशांना अवास्तव भाडे आकारले जात असून विरोध केल्यास उद्धटपणे वागणूक आणि दमदाटी केली जात असल्याचा आरोप सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल वि. शेटे यांनी केला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून संबंधित रिक्षा चालकांवर वाहतूक विभाग आणि आरटीओने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत शेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार २२ सप्टेंबर रोजी रात्री 8.30च्या सुमारास डी मार्ट ते ९० फूट रोड, कांचनगाव-ठाकुर्ली असा प्रवास करण्यासाठी त्यांनी रिक्षा केली. या मार्गासाठी मागील काही महिन्यांपासून सुमारे १५० रुपये भाडे आकारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यावेळी त्यांच्याकडून १८० रुपये भाड्याची मागणी करण्यात आली. अतिरिक्त ३० रुपये भाडे का आकारले जात आहे असा सवाल विचारल्यानंतर संबंधित रिक्षा चालकाने एवढेच भाडे द्यावे लागेल. जायचे असेल तर जा, असे उद्धटपणे सांगितले. विशेष म्हणजे परिसरातील इतर रिक्षा चालकांनाही ९० फूट परिसरात १८० रुपयांपेक्षा कमी भाड्यात प्रवासी घेऊ नयेत, असा तोरा दाखवला. त्यानंतर याबाबत जाब विचारल्यानंतर काही रिक्षा चालकांनी एकत्र येऊन मोठ्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली.

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!

ॲपबेस रिक्षाचालकांनाही केली जाते दमदाटी

डी मार्ट परिसरात ओला किंवा उबर चालक प्रवाशांना घेण्यासाठी आल्यास त्यांनाही काही रिक्षा चालकांकडून दमदाटी केली जाते असा आरोप शेटे करीत आहेत.

रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यांना वाहतुकीचे नियम पाळणे, अनधिकृत ठिकाणी रिक्षा उभी न करणे, प्रवाशांकडून अवाजवी भाडे न आकारणे, भाडे नाकारणे टाळणे तसेच प्रवाशांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी शेटे यांनी संबंधित वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

डी मार्ट परिसरातील रिक्षा चालकांकडून होत असल्याचा आरोप असलेला हा प्रकार तातडीने थांबवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण, ठाणे शहर वाहतूक शाखा आणि कोळशेवाडी वाहतूक नियंत्रण उपशाखेने संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमभंगह आढळल्यास योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही विशाल शेटे यांनी केली आहे.

मुजोरांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे

याबाबत भाजपा प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जर काही रिक्षा चालक अशा प्रकारे वागत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे. आम्ही युनियन म्हणून अशा लोकांना पाठीशी घालणार नाही. हा विषय आमच्याकडेही आला असून आरटीओ अधिकारी व वाहतूक पोलिस यांना याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Dombivli dmart rickshaw stand overcharging complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Dombivli
  • Dombivli News
  • Traffic Police

संबंधित बातम्या

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु
1

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई
2

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.