Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: ठाण्याच्या डॉक्टरचा विदेशात डंका, डॉ. निलेश पोतदार यांना Asia’s Modern Hero Award

Thane News: ठाण्यातील न्यूरोसर्जन डॉ. निलेश पोतदार यांना मनिला, फिलिपिन्स येथे Asia's Modern Hero Award 2026 या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 25 सप्टेंबर रोजी ओकाडा हॉटेलमध्ये झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 01, 2026 | 04:50 PM
Dr Nilesh Potdar Wins Asia's Modern Hero Award 2026:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Dr Nilesh Potdar Wins Asia's Modern Hero Award 2026:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यातील डॉ. निलेश पोतदार यांना Asia’s Modern Hero Award 2026 मिळाला.
  • मनिल्यात 25 सप्टेंबरला झालेल्या सोहळ्यात त्यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान करण्यात आला.
  • ब्रेन, स्पाइन आणि एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीतील त्यांच्या कामाचा लेखात उल्लेख आहे.
Dr Nilesh Potdar Wins Asia’s Modern Hero Award 2026: ठाण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ठाण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. निलेश पोतदार यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे त्यांना Asia’s Modern Hero Award 2026 ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा 25 सप्टेंबरला मनिला येथील प्रसिद्ध ओकाडा हॉटेलमध्ये झाला. ECOP चे अध्यक्ष डॉ. सर्जिओ ऑर्टिज-लुईस ज्युनिअर आणि झेक प्रजासत्ताकचे राजदूत श्री. कारेल हेयट्स यांच्या हस्ते डॉ. पोतदार यांना हा अवॉर्ड देण्यात आला. देशविदेशातील मोठे डॉक्टर आणि उद्योजक या कार्यक्रमाला आले होते, त्यात आपल्या ठाण्याच्या डॉक्टरने बाजी मारली.डॉ. निलेश पोतदार हे दोन हॉस्पिटलशी जोडलेले आहेत. ते मर्क्युरी हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत आणि गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन म्हणून काम करतात. Thane News:

कठीण सर्जरीमध्ये हातखंड

डॉ. पोतदार यांचं नाव ब्रेन आणि स्पाइन सर्जरीमध्ये मोठं आहे. ज्या सर्जरी करायला अनेक डॉक्टर घाबरतात, त्या सर्जरी ते अगदी अचूकपणे करतात. त्यांची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी.यात काय होतं तर पाठीच्या मणक्याची सर्जरी करताना मोठा काप द्यावा लागत नाही. छोट्याशा छिद्रातूनच कॅमेरा टाकून सर्जरी केली जाते.

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या – Navarashtra

त्यामुळे पेशंटला वेदना कमी होतात, रक्त पण कमी जातं आणि पेशंट दोन-तीन दिवसात चालायला लागतो. आधी अशा सर्जरीनंतर महिना भर आराम करावा लागायचा, आता तसं नाही.त्यांच्या या अचूक उपचार पद्धतीमुळेच त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. याआधी 2025 मध्ये पण त्यांना मोठा सन्मान मिळाला होता. सिलिकॉन इंडिया हेल्थकेअरने त्यांची निवड देशातल्या टॉप 10 न्यूरोसर्जनच्या यादीत केली होती.

डॉ. पोतदार काय म्हणाले?

पुरस्कार मिळाल्यावर डॉ. निलेश पोतदार म्हणाले, “अचूक उपचार हेच माझं ध्येय आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. हा सन्मान फक्त माझा नाही, तर मर्क्युरी हॉस्पिटल आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमधील माझ्या पूर्ण टीमचा आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या लोकांना मुंबईला न जाता ठाण्यातच ब्रेन आणि स्पाइनचे अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या

खरंच ठाणेकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आधी अशा मोठ्या सर्जरीसाठी लोकांना मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागायचं. पण आता तेच आधुनिक तंत्रज्ञान आणि तेच एक्सपर्ट डॉक्टर ठाण्यातच उपलब्ध आहेत. डॉ. पोतदार यांच्या रूपाने ठाण्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा न्यूरोसर्जन मिळाला आहे.या पुरस्कारामुळे आता ठाण्याचं नाव वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं आहे. भविष्यात त्यांच्या हातून अजून मोठं काम होईल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Dr nilesh potdar asias modern hero award 2026 neurosurgeon rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Thane news

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द
1

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

Jalgaon News: पाणीटंचाईची चाहूल लागताच प्रशासन अलर्ट! ‘या’ तारखेरपूर्वी पाणी आराखडा तयार करण्याचे आदेश
2

Jalgaon News: पाणीटंचाईची चाहूल लागताच प्रशासन अलर्ट! ‘या’ तारखेरपूर्वी पाणी आराखडा तयार करण्याचे आदेश

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
3

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप
4

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.