Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: घरफोडीसाठी शिरला अन् नागरिकांच्या तावडीत सापडला! चोपड्यात चोरटा अटकेत

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील श्रीकृष्ण कॉलनीत १७ नोव्हेंबर रोजी पहाटे घरफोडीचा प्रयत्न नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. बंद घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या १९ वर्षीय आशिष शिवा चव्हाण याला नागरिक आणि पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 19, 2026 | 03:57 PM
Jalgaon News:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चोपड्यात मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला.
  • नागरिक आणि पोलिसांनी पाठलाग करून १९ वर्षीय संशयिताला पकडले.
  • संशयितासोबतच्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी.
चोपडा (वा.) शहरातील श्रीकृष्ण कॉलनीत मध्यरात्री बंद घरात घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका परप्रांतीय संशयिताला नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. १७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. Jalgaon News:

चोरट्याला पकडताना झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, संशयितालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी व पंचायत समितीचे सिव्हिल इंजिनीअर हर्षल मधुकर भोई (३१) हे सोमवारी रात्री जेवण आटोपून कुटुंबासह झोपले होते. मंगळवारी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास घराबाहेर काहीतरी आवाज ऐकू आल्याने त्यांना जाग आली.

त्यांनी खिडकीतून पाहिले असता काही इसम कॉलनीत संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. प्रसंगावधान राखत भोई यांनी तातडीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना सावध केले.

नागरिक आणि पोलिसांनी केला पाठलाग

भोई यांचा आवाज ऐकून कॉलनीतील गोकुळ भगवान न्हावी (२५), अर्जुन धनराज पाटील (५०), पंढरीनाथ छन्नू पाटील (६२) आणि भूषण भीमराव पाटील (३४) है नागरिक तत्काळ घराबाहेर धावून आले. नागरिक जमा झाल्याचे पाहताच संशयितानी तेथून पळ काढला. याच वेळी रात्रगस्तीवर असलेले शहर पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आणि पोलिसांनी मिळून पाठलाग करत एका संशयिताला ताब्यात घेतले आशिष शिवा चव्हाण (वय १९, रा. कन्हेरी, ता. उकशी, जि. धार, मध्य प्रदेश) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे.

आरोपीच्या झटापटीत दोन पोलिस जखमी

पोलिसांनी आशिष चव्हाण याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्यासाठी झटापट केली. या झटापटीत पोलीस कर्मचारी अक्षय पाटील यांच्या हनुवटीला मार लागून ते जखमी झाले, तर पोलीस कर्मचारी जगन्नाथ पाटील यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली.

Wardha News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच! पुलगाव, आष्टीत आंदोलनाचा भडका, समान काम समान वेतनासाठी ३४ हजार कर्मचारी संपावर

दुखापत होऊनही दोन्ही कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत संशयिताला निसटू दिले नाही, रात्रगस्त ड्युटीवर असलेले पोलीस निरीक्षक पवन देसले यानी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याऱ्यांसह संशयित आशिष चव्हाण याला चौपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Ulhas River Pollution: उल्हास नदीच्या प्रदूषणाला बसणार आळा; नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटींचा प्रकल्प

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू

प्राथमिक तपासानुसार, आशिष चव्हाण हा श्रीकृष्ण कॉलनीतील महेंद्र वना पाटील यांच्या बंद घरात घरफोडी करून चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Chopda house burglary attempt foiled two policemen injured rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra news
  • Poltical News

संबंधित बातम्या

Indian Economy: केंद्राच्या तिजोरीला भगदाड; रोजच्या खर्चासाठीही नव्याने कर्ज घेण्याची वेळ
1

Indian Economy: केंद्राच्या तिजोरीला भगदाड; रोजच्या खर्चासाठीही नव्याने कर्ज घेण्याची वेळ

वाहतूक कोंडी मुक्त रोहा करण्याचा संकल्प, रोहा अष्टमी नगर परिषद येथे वाहतूक नियोजनाची  महत्त्वाची बैठक संपन्न..
2

वाहतूक कोंडी मुक्त रोहा करण्याचा संकल्प, रोहा अष्टमी नगर परिषद येथे वाहतूक नियोजनाची महत्त्वाची बैठक संपन्न..

Maharashtra Lift Rules 2026: लिफ्ट वापरण्याबाबत राज्य सरकारचे नवीन नियम लागू; ‘या’ व्यक्तींना करता येणार नाही वापर
3

Maharashtra Lift Rules 2026: लिफ्ट वापरण्याबाबत राज्य सरकारचे नवीन नियम लागू; ‘या’ व्यक्तींना करता येणार नाही वापर

Jalgaon DCC Bank Election 2026 : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीचा धडाका! गुलाबराव पाटील, गिरीश महाजन बिनविरोध!
4

Jalgaon DCC Bank Election 2026 : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीचा धडाका! गुलाबराव पाटील, गिरीश महाजन बिनविरोध!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.