Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! बारवी जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे २४ तास पाणीपुरवठा बंद

KDMC News: कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगरकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. एमआयडीसीच्या बारवी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सलग २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 18, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवली परिसरात १९ नोव्हेंबरपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
  • पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी महापालिकेकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होणार नाही
  • नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे
उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवलीकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारवी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत – सलग २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी १६ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिकृत सूचना जारी केली आहे.

गृहिणी, नोकरदार, व्यावसायिकांना बसणार फटका

ऐन कामकाजाच्च्या दिवसांत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने गृहिणी, नोकरदार, व्यावसायिकांसह औद्योगिक क्षेत्रालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः पाण्याचा नियमित वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वीच नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावृत्ताला उल्हासनगर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले, उपअभियंता दीपक ढोले यांनी दुजोरा दिला आहे.

KDMC News: केडीएमसी आयुक्तांचा मुस्लिम समाजाला दिलासा; कल्याण-डोंबिवलीत तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा देण्याचे आश्वासन

पाणी बंदचा फटका अनेकांना बसणार

या पाणीबंदचा फटका उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, डोंबिवली व तळोजा औद्योगिक क्षेत्र तसेच परिसरातील ग्रामपंचायतींना बसणार आहे. विशेष म्हणजे, २४ तासांचा पाणीपुरवठा बंद संपल्यानंतरही लगेच नियमित दाबाने पाणी उपलब्ध होईलच, असे नाही. पाणीपुरवठा पूर्ववत करताना काही काळ कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता एमआयडीसी प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास आणखी काही काळ सहन करावा लागू शकतो.

कोणत्या भागांना होणार नाही पाणीपुरवठा

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व पश्चिम, कल्याण ग्रामीण विभाग, डोंबिवली पूर्व पश्चिम होणारा पाणीपुरवठा गुरुवार १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Navi Mumbai News: जुन्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती; पुनर्विकासामुळे नवी मुंबईच्या नियोजनापुढे नवे आव्हान

तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत आठवड्यातील दर गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवार रात्री १२ वाजेपर्यंत (२४ तासांकरीता) पाणीपुरवठा बंद राहील. तसेच पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी महापालिकेद्वारे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक तितकाच वापर करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये पाणीपुरवठा कधी बंद राहणार आहे?

    Ans: १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

  • Que: पाणीपुरवठा किती तास बंद राहणार आहे?

    Ans: एमआयडीसीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे सलग २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

  • Que: कोणत्या भागांना पाणीबंदचा फटका बसणार आहे?

    Ans: उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, डोंबिवली आणि तळोजा औद्योगिक क्षेत्र तसेच परिसरातील ग्रामपंचायत क्षेत्रांना याचा फटका बसणार आहे.

Web Title: Kalyan dombivli ulhasnagar water supply 24 hours closed pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Kalyan Dombivli Municipal Corporation
  • KDMC
  • Water supply

संबंधित बातम्या

KDMC News: केडीएमसी आयुक्तांचा मुस्लिम समाजाला दिलासा; कल्याण-डोंबिवलीत तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा देण्याचे आश्वासन
1

KDMC News: केडीएमसी आयुक्तांचा मुस्लिम समाजाला दिलासा; कल्याण-डोंबिवलीत तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा देण्याचे आश्वासन

महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! Kalyan चे डॉ. प्रशांत पाटील रेडिओलॉजिस्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
2

महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! Kalyan चे डॉ. प्रशांत पाटील रेडिओलॉजिस्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

Water Issue: ‘पाणी द्या, अन्यथा…’ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवले कुणासाठी? नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे ठप्प
3

Water Issue: ‘पाणी द्या, अन्यथा…’ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवले कुणासाठी? नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे ठप्प

KDMC तील स्वीकृत नगरसेवक निवडीचा तिढा कायम; ठाकरे गट आक्रमक, शहरातील १० ठिकाणी आंदोलनाचा इशारा!
4

KDMC तील स्वीकृत नगरसेवक निवडीचा तिढा कायम; ठाकरे गट आक्रमक, शहरातील १० ठिकाणी आंदोलनाचा इशारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.