Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

कर्जत तालुक्यात पंचायत समितीचे १२ गण असून मतमोजणी साठी १२ टेबल लावण्यात आले आहेत. त्या टेबल वर प्रत्येक एक मशीन असे मतमोजणी होणार असून त्यात गट आणि गण अशी मतमोजणी केली जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 08, 2026 | 09:07 PM
कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? (Photo Credit- X)

कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी!
  • कोणाचे नशीब उघडणार?
  • प्रशासकीय भवनात जय्यत तयारी
ZP Election Result 2026: कर्जत तालुक्यात शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले असून त्या ईव्हीएम मध्ये बंदिस्त झालेल्या मतांची मोजणी उद्या कर्जत येथील प्रशासकीय भवन येथे होणार आहे. कर्जत तालुक्यात पंचायत समितीचे १२ गण असून मतमोजणी साठी १२ टेबल लावण्यात आले आहेत. त्या टेबल वर प्रत्येक एक मशीन असे मतमोजणी होणार असून त्यात गट आणि गण अशी मतमोजणी केली जाणार आहे. तालुक्यात साधारण सर्वाधिक २३ बूथ नेरळ गणात असून त्या नेरळ गणांची मतमोजणी सर्वात उशीरा पर्यंत चालणार आहे.

कर्जत तालुक्यामध्ये अत्यंत चुरशीने पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवार सात फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यातील २२० मतदान केंद्रावर १ लाख ३० हजार १७५ मतदान झाले आहे. त्या ईव्हीएम मशीन सध्या कर्जत प्रशासकीय भवन येथील स्ट्राँग रूम मध्ये आहेत. उद्या ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार असून मतमोजणी साठी १२ टेबल लावण्यात आले आहे.

Karjat Election 2026 : आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात

प्रत्येक टेबल वर एक ते १२ गण अशी मतमोजणी एकाचवेळी सुरू होणार आहे. त्यात त्या ईव्हीएम मशीन मधील गट आणि गण यांचे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या मतपेट्या (ईव्हीएम मशीन) या पुन्हा स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात येतील आणि दुसऱ्या १२ मशीन मतमोजणी कक्ष येथे आणले जातील.अशी प्रक्रिया सर्व मतमोजणी टेबल वर सुरू राहणार असून नेरळ गण मध्ये सर्वाधिक २३ बूथ असून तेथील मतमोजणी सर्वात उशीरा संपणार आहे.

२२० मतदान केंद्र वरील मतमोजणी पूर्ण होण्यास साधारण दुपारचे दोन वाजण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी.यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सूक्ष्म नियोजन करत आहे. तहसीलदार जाधव स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून असून त्यांनी महसूल कर्मचारी व निवडणूक विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

तगडा पोलिस बंदोबस्त..

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आतापर्यंत आपली भूमिका चोख बजावली असून, उद्याच्या मतमोजणीसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रशासकीय भवन परिसरात केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असून,परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असेल.

Karjat News : “नेरळमध्ये मोरे -चंचे म्हणजे विकास असेच समीकरण…”, कर्जत परिवर्तन आघाडीचे प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचे मत

Web Title: Karjat zp panchayat samiti election counting 9 february result update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Election News
  • Karjat
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये अश्वपालांचे ठिय्या आंदोलन; पेव्हर ब्लॉकबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी
1

Matheran News: माथेरानमध्ये अश्वपालांचे ठिय्या आंदोलन; पेव्हर ब्लॉकबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान
2

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.