आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात
कर्जत : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज (7 फेब्रुवारी) मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी निवडणुका होत आहेत. एकूण ७,४३८ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र आहेत आणि २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशातच कर्जतमधून एक बातमी समोर येत आहे . कर्जतमधील आत्रंड नीड गावातील नवरदेव आणि कुटुंबातील सदस्यांनी लग्न सोहळ्याला निघण्याआधी मतदान केंद्रात जाऊन रस्त्यात थांबून केले मतदान केले.
कर्जत तालुक्यातील आत्रंड नीड गावातील संदेश सुरेश धुके यांचे आज लग्न आहे.पनवेल येथे लग्न सोहळ्याला जात असताना आज असलेले मतदान लक्षात घेऊन नवरदेव संदेश आणि त्यांचे कुटुंबीय हे ब्रास बँड पथक यांच्यासह वराती मधून गावातून पनवेल कडे निघाले होते.मात्र लग्न सोहळ्यासाठी जात असताना रस्त्यामध्ये असलेल्या कशेळे जिल्हा परिषद गटाच्या मतदान केंद्रात थांबून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे काम करण्यात आले आहे.
आत्रंड नीड गावातील नवरदेव संदेश सुरेश धुळे हा आपल्या लग्नासाठी पनवेल येथील सावळे रसायनी येथे निघाला होता. रस्त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा आत्रंड निड येथे वरात रस्त्यामध्ये थांबून मतदान केंद्रावर जाऊन नवरदेवाकडून मतदान करण्यात आले.तसेच नवरदेवाचे वडील सुरेश दामू धुळे आई संगीता सुरेश धुळे व भाऊ आदेश धुले या कुटुंबाने रस्त्यामध्ये नवरदेवाची वरात थांबून मतदान करत एक आदर्श निर्माण केला आहे. लग्नासाठी जात असताना रस्त्यामध्ये वरात थांबून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे काम धुले कुटुंबियांकडून करण्यात आले.लग्नासाठी विलंब होईल याचाही विचार न करता प्रथम देशाचे नागरिक आणि देश हितासाठी मतदान हे केलेच पाहिजे. असे म्हणत, रस्त्यामध्ये वरात थांबून प्रथम मतदान केले व नंतर पुढे सावळे रसायनी पनवेल येथे लग्नासाठी निघून गेले.लोकशाहीचा पाया मजबूत करण्याचे काम धुळे कुटुंबाकडून करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर किंवा त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर केला आहेत. त्यानुसार ५ फेब्रुवारी रोजी सर्वत्र मतदान झाले असते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाची तारीख बदलण्यात आली. त्यानुसार शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.






