Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅगीच्या पाकिटात किडे सापडल्याचा आरोप; Nestle India ने हात झटकले? दिलं मोठं स्पष्टीकरण

Nestle India : मुंबईतील कल्याण परिसरात मॅगी नूडल्सच्या पाकिटात किडे आणि अळ्या आढळल्याचा ग्राहकाने दावा केला आहे. यानंतर नेस्ले इंडियाने प्रतिक्रिया देत तक्रारीची अधिकृत माहिती अद्याप मिळाली नसल्याचं सांगितलं आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 27, 2026 | 07:30 PM
Kalyan Maggi News

Kalyan Maggi News

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमध्ये मॅगीच्या पाकिटात किडे-अळ्या आढळल्याचा ग्राहकाचा दावा
  • पाकिटाची एक्सपायरी फेब्रुवारी 2027 असल्याचं सांगण्यात आलं
  • नेस्ले इंडियाने दिलं स्पष्टीकरण
 

कल्याण परिसरातून मॅगी नूडल्सबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. एका ग्राहकाने मॅगीचं पाकीट तयार करताना त्यामध्ये किडे आणि अळ्या आढळल्याचा आरोप केला आहे. या प्रकारानंतर पॅकेज्ड फूडच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता यावर नेस्ले इंडियाकडून (Nestle India) स्पष्टीकरण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहक मॅगी नूडल्स बनवत असताना त्यामध्ये किडे आणि अळ्या दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित पाकिटावर फेब्रुवारी 2027 अशी एक्सपायरी डेट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उत्पादनाची मुदत संपलेली नसतानाही असा प्रकार कसा घडला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

FDA कडे तपासणीची मागणी

या कथित प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA ने याची दखल घ्यावी आणि संबंधित उत्पादनाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

Mumbai News : सार्वजनिक शौचालयात दोघांचा मृत्यू; रासायनिक वायूमुळे मृत्यूचा संशय, पोलिसांचा तपास सुरू ….

नेस्ले इंडियाने दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणावर नेस्ले इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, या प्रकरणाची माहिती कंपनीला माध्यमांमधून मिळाली असून अद्याप संबंधित ग्राहक किंवा अधिकाऱ्यांनी कंपनीशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे सध्या या तक्रारीच्या सत्यतेबाबत भाष्य करता येणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

कंपनीने पुढे सांगितलं की, कच्च्या मालाच्या खरेदीपासून उत्पादन आणि पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक टप्प्यावर अनेक गुणवत्ता तपासण्या केल्या जातात. उत्पादन प्रक्रिया लागू असलेल्या गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा मानकांनुसार केली जाते, असंही नेस्ले इंडियाने म्हटलं आहे.

तसंच, आपल्या उत्पादन केंद्रांमध्ये गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा व्यवस्थापनाची मजबूत यंत्रणा असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि उच्च दर्जाची उत्पादनं देण्याची आपली बांधिलकी कायम असल्याचंही नेस्ले इंडियाने म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणातील ग्राहकाचा दावा अधिकृत तपासणीत सिद्ध झालेला नाही. त्यामुळे संबंधित उत्पादनाचा नमुना तपासल्यानंतरच कथित दूषितपणाबाबत निश्चित निष्कर्ष समोर येऊ शकतो.

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

Web Title: Maggi noodles insects worms kalyan mumbai nestle india response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • FDA
  • kalyan news
  • Nestle

संबंधित बातम्या

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी
1

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ
2

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
3

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
4

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.