Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव? सौजन्य : सोशल मीडिया
उल्हास नदीच्या पाण्यातील टर्बिडिटी अर्थात गढूळपणा वाढल्याने बदलापूर शहरातील पाणी उपसा आणि उपलब्ध पाण्याच्या प्रमाणावर परिणाम झाला असून पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल व्यवस्थापन उपविभागाने नागरिकांना पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे.
नदीचे पाणी अचानक एवढे गढूळ होण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शिरगाव एमआयडीसीसह विविध भागांतून नदीत रासायनिक सांडपाणी मिसळत असल्याचा तसेच नदी परिसरातील मातीचा भराव आणि राडारोड्यामुळे गढूळपणा वाढत असल्याचा आरोप केला जात आहे.
Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..
संबंधित शासकीय यंत्रणांनी नदीच्या पाण्याचे तातडीने नमुने घेऊन वैज्ञानिक तपासणी करावी, प्रदूषणाचा स्रोत शोधावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असताना लोकप्रतिनिधी या गंभीर विषयावर मौन का आहेत, असा संतप्त सवालही बदलापूरकरांकडून उपस्थित केला जात आहे.
Nagpur News : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे






