फोटो सौजन्य सोशल मिडिया
Mumbai News : मुंबई गोरेगाव येथिल राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मृणाल गोरे उड्डाण पुलाजवळ असलेल्या शौचालयात घडली. या दोन तरुणांचा मृत्यू रासायनिक वायूमुळे झाला असावा; असा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना सकाळी 8.30 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या दोन तरुणांना गोरेगाव येथिल ट्रामाकेअर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु डॅाक्टरांनी या दोन्ही तरुणांना मृत्त घोषित केले. प्रभाकर धनिवार ( वय वर्षे 24 ) आणि भाविन देसाई (वय वर्षे 18 ) अशी मृत तरुणाची नावे आहेत.
मुंबईच्या गोरेगाव येथिल राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना मृणालताई गोरे उड्डाण पुलाजवळच्या शौचालयातली असून रासायनिक वास पसरल्यानंतर मृत व्यक्तींचा श्वास कोंडल्याने त्यांना त्रास झाला असावा.
शौचालयाच्या बाजूला रासायनिक कारखाना असल्याची माहिती समोर येत आहे या मध्ये अॅसिड आणि इतर रासायनिक पर्दार्थांचा वापर होत असल्याची माहिती समोर येत आहे .
मुंबईच्या गोरेगाव राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, MPCB आणि BMC च्या संबंधित पथकांनी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि शौचालयात कोणता रासायनिक पदार्थ पोहोचला याचा तपास सुरू आहे.
मुंबई गोरेगाव येथिल राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून ही घटना मृणाल गोरे उड्डाण पुलाजवळ असलेल्या शौचालयात घडली, या तरुणांचा मृत्यू रासायनिक वायूमुळे झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेवर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.या दोन्ही तरुणांना न्याय मिळाला पाहिजे? जर या दोन तरुणांना न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाला बसू असे आव्हान स्थानिक नागरिकांनी केली आहे.
जेथे स्थानिक नागरिक राहतात तेथे रासायनिक कंपनी चालवली जाते कशी; अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असून आमच्या इथे 60 लोकांचे कुंटुंब राहते. प्रशासनाने या रासायनिक कंपनीवर कारवाई केली पाहिजे. असे नागरिकांनी मागणी केली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार शौचालयाच्या बाजूलाच गटार लाईन असल्याने या गटाराला लागून एक इलेक्ट्रोप्लेटींगचा छोटासा कारखाना आहे. या केमिकलच्या वासामुळे या दोन मुलांचा गुदमरुन मृत्यू झाला असावा असे पोलिसांनी सांगितले.
मुंबई गोरेगाव राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असताना स्थानिक खासदार रविंद्र वायकर यांनी दोषींवर कडक कारवाई व्हावी; असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?






