Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran leopard : माथेरान घाटात प्रवासादरम्यान बिबट्याचे दर्शन; टॅक्सी चालकाने व्हिडिओ शूट, वन विभाग सतर्क

माथेरान घाटात प्रवास करताना बिबट्याचे दर्शन झाले असून, एका टॅक्सी चालकाने त्याचा व्हिडिओ शूट केला. घटनेनंतर वन विभाग सतर्क झाला असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 15, 2026 | 02:27 PM
माथेरान घाटात प्रवासादरम्यान बिबट्याचे दर्शन; टॅक्सी चालकाने व्हिडिओ शूट, वन विभाग सतर्क

माथेरान घाटात प्रवासादरम्यान बिबट्याचे दर्शन; टॅक्सी चालकाने व्हिडिओ शूट, वन विभाग सतर्क

Follow Us
Follow Us:
  • माथेरान घाटातील प्रवासात बिबट्याचे दर्शन..
  • टॅक्सी चालकाने केले शूट…
  • वन विभाग सतर्क
माथेरान : माथेरान आणि पायथ्याशी असलेल्या वन क्षेत्रात वन्यजीवांचे वास्तव्य असल्याच आढळून आले आहे.काल रात्री माथेरान घाट रस्त्याने प्रवास करणारा बिबट्या अनेकांचे नजरेस पडला.हा बिबट्याला टॅक्सी चालकाने आपल्या मोबाईल मध्ये शूट केल्याने बिबट्याचा वावर माथेरान जंगलात. आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. दरम्यान,बिबट्याच्या दर्शनाने वन विभागाने स्थानिक रहिवाशी यांना सतर्क राहावे अशी सूचना करण्यास फलकबाजी सुरू केली आहे.

माथेरानच्या डोंगरात सातत्याने बिबट्याचा वावर आढळून आला आहे.यावर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात माथेरान डोंगरातील वाड्यांमध्ये बिबटे पोहचले होते.त्याचवेळी कुंभे आंबिवली भागात देखील त्यांचा वावर दिसून आला होता.त्यावेळी माथेरान नेरळ आणि कर्जत पश्चिम वन विभागाच्या दुरशेत्र कार्यालय यांच्याकडून स्थानिक लोकांच्या गाव बैठका घेण्यात आल्या होत्या,त्यात सूचनांचा पाऊस पडला होता. मात्र अनेकवेळा बिबट्याचे दर्शन तसेच वहिवाट दिसून आल्यानंतर त्या बिबट्यांकडून कोणताही धोका उद्भवला नव्हता.मागील एक महिन्यात कुठेही बिबट्याचा वावर दिसून आला नव्हता.

Raigad News: मुरुडमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; केवळ १ तासच पाणीपुरवठा, कोर्लई गाव सर्वाधिक प्रभावित

परंतु 14 एप्रिल रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास माथेरान घाटात मुख्य रस्त्याने बिबट्याची धावपळ सुरू होती.त्यावेळी माथेरान येथील रहिवाशी असलेले टॅक्सी चालक महेंद्र जाबरे हे प्रवासी यांना घेऊन नेरळ स्टेशन कडे येत होते.त्यावेळी गार्बेट रस्त्याच्या बाजूला हा बिबट्याचे दर्शन झाले आणि त्यावेळी गाडीच्या हेड लाईट मधून पुढे पुढे जाणारा बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करता आले.पुढे हा बिबटा सिमेंट कठडा चढून गार्बेट वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या खाली उतरला.काही दिवस आधी एका पर्यटकाला त्यांच्या दुचाकी समोरून बिबट्याला रस्ता ओलांडता आढळून आला होता.ही घटना काही तासात जगभर पोहचली असून वन विभागाने आज सकाळ पासून बिबट्याच्या अस्तित्वाचे पाऊलखुणा मिळतात का? हे पाहण्यासाठी माथेरान घाटात शोध मोहीम सुरू केली तर स्थानिक टॅक्सी चालक यांना बिबट्याचा वावर दिसून आल्याने वन विभागाने खबरदारी म्हणून गावोगाव गावबैठका घेण्यास सुरुवात केली आहे.वन विभागाने बिबट्या दिसल्यानंतर काय करावे? याबाबत सूचना देणारे फलक देखील लावण्यास सुरुवात केली आहे.त्यात बिबट्याचे प्रवास ज्या बाजूने झाला तो भूभाग नेरळ माथेरान वनक्षेत्रपाल यांच्याकडील तर बिबट्याने पुढे प्रवास ज्या गार्बेट गाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने केला तो भूभाग कर्जत पश्चिम वनक्षेत्रपाल यांच्या कडील आहे.त्यामुळे दोन्ही दुरक्षेत्र विभागाचे अधिकारी यांनी जंगल परिसरात जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.

महेंद्र जाबरे.. टॅक्सी चालक

“मी नंबर लागला म्हणून प्रवासी घेऊन खाली नेरळ कडे जात होतो.गाडी पहिल्या टर्न उतरत असताना गाडीच्या हेड लाईट मध्ये प्राणी धावत असताना दिसून आला. उतार असल्याने गाडीचा वेग चांगला होता आणि त्यामुळे काही सेकंदात बिबट्याचा समोरून आमची गाडी जाऊ लागली.बिबट्याचा वावर आमच्या अनेक टॅक्सी चालक यांना दिसून आल्याने आम्ही लगेच आपल्याकडील मोबाईल मध्ये तो क्षण घेण्याचा प्रयत्न केला.मात्र साधारण 50 मीटर रस्त्याने जात पुढे त्या बिबट्याने गार्बेट रोड कडे जाणाऱ्या कठड्यावर उडी घेतली आणि खाली उतरला.त्यावेळीं काळोख असल्याने आणि गाडी मध्ये पर्यटक प्रवासी असल्याने प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही खाली आलो.”

समीर खेडेकर.. वनक्षेत्रपाल कर्जत पश्चिम

माथेरान जंगल आणि पायथ्याशी असलेल्या जंगलात बिबट्याचे अस्तित्व दिसून येत आहे.ही बाब जंगलासाठी चांगली आहे.पण त्या प्राण्याकडून कोणालाही धोका पोहचू नये यासाठी आम्ही सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

निलेश खेडेकर.. वनक्षेत्रपाल

माथेरान जंगलात धसवाडी,जुम्मापट्टी, बेडिसगाव येथे बिबट्याचे दर्शन होत असते.त्यामुळे आम्ही सतत बिबट्याचे वावर दिसून आल्यास कोणती खबरदारी घ्यावी यांची माहिती दिलेली आहे.

मुंबई शहरात ३३ हजार झाडांची छाटणी! पालिकेचे मान्सूनपूर्व काम, उष्णता आणि वायू गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती

Web Title: Matheran ghat leopard sighting taxi driver video forest department alert news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Forest Department
  • Matheran

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
2

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल
3

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल

Raigad News: ऐन पावसाळ्यात माथेरान तहानले! तीन-तीन दिवस पाणी गायब, पर्यटन व्यवसाय संकटात
4

Raigad News: ऐन पावसाळ्यात माथेरान तहानले! तीन-तीन दिवस पाणी गायब, पर्यटन व्यवसाय संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.