माथेरान/संतोष पेरणे: शहरातील रस्ते डांबरी नाहीत आणि त्यामुळे दगड माती बनविण्यात आलेल्या रस्त्यांवर लोखंडी रोलर फिरवून रस्ता बनविला जातो. रस्त्यांवर दगड माती टाकल्यावर रस्त्याचे मजबुतीकरणासाठी लोखंडी रोलर वापरला जातो. दरम्यान या कामासाठी आणलेला रोलर रस्त्याच्या मधोमध ठेवून देण्यात आला असून त्यामुळे रुग्णवाहिका जाण्यास देखील मार्ग शिल्लक नाही.
माथेरान या प्रदूषण मुक्त शहर असल्याने माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणाऱ्या वाहनांना बंदी आहे. तेथे दगड आणि लाल माती पासून बनवलेले रस्ते असून या रस्त्यांची वर्षातून दोनदा डागडूगी करावी लागते.शहरात सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेवटी माथेरान पालिकेकडून रस्त्यावर दगड माती टाकून दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे.त्यासाठी ठेकेदार लोखंडी रोलर यांचा वापर करतात आणि त्यामुळे रस्ते आणखी मजबूत होतात.शहरातील वापर लुईजा रस्त्यावर दगड माती टाकून रस्ता बनविला अजात होता.त्यासाठी पालिकेने परवानगी दिलेली लोखंडी रोलर तेथे नेण्यात आले होते.त्यानंतर तेथे किरकोळ कामे पूर्ण करून संबंधित रोलर रस्त्याच्या कडेला उभे करण्याची गरज असताना ठेकेदाराने त्या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी नेलेला रोलर तेथे रस्त्याच्या मधोमध ठेवून दिला.त्याचा परिणाम रस्त्यावरून माथेरान मध्ये परवानगी असलेले रुग्णवाहिका सारखे वाहने देखील जाण्यास रस्ता शिल्लक राहिलेला नाही.
या बाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेला सूचना केल्यानंतर देखील लोखंडी रोलर आहे तेथे हा असून पळविल्या कारभार कोणत्या दिशेने सुरू आहे याचा प्रत्यय आला आहे.अप्पर लुईजा भागात देखील लोकवस्ती असून या काळात त्या भागात कोणी आजारी पडले तर रुग्णवाहिका नेण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.त्यात दुसरीकडे हशाची पट्टी सारखी मोठी वस्ती त्या भागात असल्याने अडचणीच्या वेळी कोणतेही वाहन तेथे पोहचण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.त्यामुळे ते लोखंडी रोलर हटवण्याची मागणी केली जात आहे.