Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली

भाईंदर पोलीस ठाण्यासमोर MBMC परिवहन विभागाच्या एका बसचे पुढील चाक आडवे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने बस थांबल्यानंतर हा गंभीर बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संबंधित बसच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्याचा दावा करण्यात येत असून, अशा बसला रस्त्यावर धावण्याची परवानगी कशी देण्यात आली?

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 26, 2026 | 04:27 PM
फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली

फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली

Follow Us
Follow Us:
  • फिटनेस संपलेल्या बसचा धक्कादायक प्रकार?
  • भाईंदरमध्ये MBMC बसचे चाक निखळण्याच्या स्थितीत
  • कोट्यवधींचा खर्च, तरी बसची दयनीय अवस्था
विजय काते, भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) परिवहन विभागाच्या एका बसची धोकादायक अवस्था गुरुवारी (26 जून 2026) भाईंदर पोलीस ठाण्यासमोर उघडकीस आली. बसच्या पुढील चाकामध्ये गंभीर बिघाड झाल्याने एका बाजूचे चाक पूर्णपणे निकामी झाले आणि ते निखळण्याच्या स्थितीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, बस भाईंदर पोलीस स्टेशन परिसरात आल्यानंतर चालकाच्या लक्षात हा बिघाड आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. सुदैवाने बस थांबल्यानंतर हा गंभीर प्रकार लक्षात आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अन्यथा, प्रवाशांनी भरलेल्या बसचे चाक धावताना निखळले असते, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली. बसची अवस्था पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार! धावत्या अ‍ॅक्टिवामधून अचानक बाहेर आला साप, चालकाची उडाली तारांबळ

दरम्यान, संबंधित बसचा क्रमांक ‘एम परिवहन’ ॲपवर तपासल्यानंतर तिच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे फिटनेस कालावधी संपलेल्या बसला रस्त्यावर धावण्याची परवानगी कशी देण्यात आली, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. बसांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदारांना लाखो ते कोट्यवधी रुपयांची देयके दिली जातात. मात्र, तरीही बसांची अशी धोकादायक अवस्था समोर येत असल्याने परिवहन विभागाच्या देखभाल व्यवस्थेवर आणि संबंधित ठेकेदारांच्या कामकाजावर टीका होत आहे. या घटनेनंतर MBMC प्रशासनाने संबंधित बसची तांत्रिक तपासणी करून बिघाडाचे नेमके कारण शोधावे, तसेच सर्व बसांच्या फिटनेस आणि देखभाल प्रक्रियेचे विशेष ऑडिट करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचीही मागणी जोर धरत आहे.

वाहन योग्यता प्रमाणपत्र

प्रत्येक कमर्शियल वाहनाला (उदा. ट्रक, बस, टॅक्सी) भारतीय रस्त्यांवर चालण्यासाठी आरटीओ (RTO) कडून हे प्रमाणपत्र मिळवणे [मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicles Act)] अनिवार्य आहे

तपासणी: वाहनाची ब्रेक टेस्ट, प्रदुषण (Emission) तपासणी, स्टीयरिंग आणि टायरची स्थिती आरटीओ अधिकारी तपासतात。
वैधता: नवीन कमर्शियल वाहनांना हे प्रमाणपत्र २ वर्षांसाठी मिळते, त्यानंतर दरवर्षी नूतनीकरण (Renewal) करावे लागते。
अर्ज प्रक्रिया: अधिक माहिती व अर्जासाठी तुम्ही Policybazaar या पोर्टलला भेट देऊ शकता。

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!

Web Title: Mbmc bus wheel malfunction near bhayandar police station fitness certificate expired claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • bus
  • mira bhayandar
  • police

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
2

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
3

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.