Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फाऊंटन-गायमुख रस्त्यावरील खड्ड्यांवरून मिरा-भाईंदरचे राजकारण तापले; महापौरांच्या पत्रावरून शिवसेना आक्रमक

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमधील फाऊंटन ते गायमुख मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. महापौरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेने आक्षेप घेत रस्त्याच्या दुरुस्तीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 03, 2026 | 07:20 PM
representative image

representative image

Follow Us
Follow Us:
  • फाऊंटन ते गायमुख या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे
  • मिरा-भाईंदरचे राजकारण तापले
  • महापौरांच्या पत्रावरून शिवसेना आक्रमक
विजय काते

मिरा रोड: ठाणे-घोडबंदर मार्गावरील फाऊंटन ते गायमुख या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून मिरा-भाईंदरमधील राजकारण पुन्हा तापले आहे. महापौर डिंपल विनोद मेहता यांनी हा रस्ता मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत दुरुस्त न करता शासनाकडूनच दुरुस्ती करून घ्यावी, अशी भूमिका घेत आयुक्तांना पत्र दिल्यानंतर शिवसेनेने त्यावर तीव्र आक्षेप घेत आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.

Satara News: शहापूर योजनेचा वीजपुरवठा बंद; साताऱ्यात मंगळवारी दुपारचा पाणीपुरवठा ठप्प, बुधवारीही परिणाम

महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात, फाऊंटन ते गायमुख हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) पुन्हा हस्तांतरित करण्याचा महासभेचा ठराव अद्याप अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठीही निधी अपुरा असल्याने या मार्गाची दुरुस्ती शासनानेच करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. महासभेच्या ठरावानुसारच कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

मात्र, या भूमिकेवर शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी वसई-विरार पोलीस आयुक्तांना निवेदन देत महापौरांनी रस्त्याच्या दुरुस्तीला अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. तसेच महापौर आणि महापालिका आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेच्या निवेदनानुसार, वाहतूक पोलिसांनी तातडीने खड्डे बुजवण्याबाबत महापालिकेला पत्र दिले असूनही प्रशासनाने प्रभावी कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील ४८ तासांत फाऊंटन-गायमुख मार्गावरील खड्डे बुजवले नाहीत, तर शहरभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

दरम्यान, फाऊंटन-गायमुख रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न आता केवळ पायाभूत सुविधांचा न राहता राजकीय वादाचा विषय बनला असून, या प्रकरणात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी-शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bavdhan Road: पहिल्याच पावसात २२ लाखांचा निधी गेला खड्यात! वाई–बावधन रस्त्याच्या निकृष्ट कामावर संताप

Web Title: Mira bhayandar fountain gaumukh road potholes political row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Mira Bhayandar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
1

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.