Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar मध्ये पाणीटंचाईचा भडका! १० टक्के कपातीच्या नावाखाली प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक कपात?

Mira Bhayandar: मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण कडून रोजचे ८६ तर एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. मात्र एमआयडीसीने १२५ दशलक्ष लिटर पाणी २०३१ पर्यंत द्यायचे आहे. सध्या एमआयडीसी ११८ दशलक्ष लिटर इतके पाणी देते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 27, 2026 | 07:38 PM
Mira Bhayandar मध्ये पाणीटंचाईचा भडका! १० टक्के कपातीच्या नावाखाली प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक कपात?
Follow Us
Follow Us:
  • मीरा भाईंदर मध्ये पाण्यासाठी हाहाकार
  • एमआयडीसी करतेय १५ टक्क्यां पेक्षा जास्त कपात
  • नागरिकांना पाणी टंचाईची धग नाहक
Mira Bhayandar/विजय काते: मीरा भाईंदर शहरात पाणी कपातीमुळे नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भेडसावून पाणी प्रश्न पेटू लागला आहे. त्यातच पाणी कपात १० टक्के असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मात्र प्रत्यक्षात १५ टक्के पेक्षा जास्त पाणी कपात करत असल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईची धग नाहक जास्त सहन करावी लागत आहे.

मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण कडून रोजचे ८६ तर एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. मात्र एमआयडीसीने १२५ दशलक्ष लिटर पाणी २०३१ पर्यंत द्यायचे आहे. सध्या एमआयडीसी ११८ दशलक्ष लिटर इतके पाणी देते तर स्टेम प्राधिकरण ८३ ते ८४ दशलक्ष लिटर पाणी शहराला रोज पुरवते असा महापालिकेचा दावा आहे. रोजचे सरासरी २०२ दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला मिळते. मंजूर कोट्यापेक्षा रोजच्या कमी होणाऱ्या पाणी पुरवठ्या मागे गळती तसेच प्रक्रिया आदी कारणे सांगितली जात आहे.

शहराची वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणात चालणारी अधिकृत आणि अनधिकृत बांधकामे ह्यामुळे पाण्याची मागणी आधीच वाढती आहे. त्यातच इतक्या वर्षात नवीन पाणी पुरवठ्यात वाढ झालेली नसून राजकारणी आणि महापालिका सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या भरवश्यावर अजून नागरिकांना आश्वासने देत आली आहे, त्यातच मीरा भाईंदर हे पाणी पुरवठ्याच्या धरणां पासून शेवटच्या टोकाला असल्याने पाणी कमी व कमी दाबाने मिळते. त्यामुळे एखाद दिवस शट डाऊन झाला तरी पाणी पुरवठा सुरळीत होण्यास ३ ते ४ दिवस जातात.

Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना दिलासा! पाणीकपात होणार नाही; आयुक्तांनी सांगितले पाणी बचतीचे नियोजन

त्यातच या वर्षी पावसाळ्या नंतरचा कमी पाऊस, अलनिनो चा प्रभाव आणि ऑक्टोबर पासूनच पावसाने दडी मारली आहे. परतीचा पाऊस देखील त्यामुळे फारसा पडला नाही. त्यातच अलनिनोच्या प्रभावमुळे पुढील वर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता शासन स्तरावरून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे असून बारवी धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत योग्य नियोजन करता यावे यासाठी आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून १० टक्के पाणी कपात राज्य सरकारने लागू केली आहे.

त्यानुसार स्टेम मार्फत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत अश्या १८ तासाकरिता तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी रात्री १२ पासून ते शनिवार दुपारी १२ वाजेपर्यंत एकुण ३६ तासाकरीता मिरा-भाईंदर शहरास होणारा पाणी पुरवठा बंद केला जात आहे.

परिणामी कपातीच्या अनुषंगाने एमआयडीसी कडून एरव्ही रोज मिळणाऱ्या सुमारे ११८ दशलक्ष लिटर पाण्या ऐवजी गेल्या शुक्रवारी केवळ १२ दशलक्ष लिटर आणि शनिवारी केवळ २७ दशलक्ष लिटर इतकेच पाणी आले. स्टेम प्राधिकरण कडून देखील एरव्ही ८३ ते ८४ दशलक्ष लिटर ऐवजी बुधवारी अवघे ३५ दशलक्ष लिटर पाणी आले.

एमआयडीसीच्या पाणी कपातीचा गेल्या १९ ते २५ ऑक्टोबर ह्या आठवड्याभराचा हिशोब केला तर ६३१ दशलक्ष लिटर पाणी आले आहे. वास्तविक गेल्या आठवड्यात सरासरी ११८ दशलक्ष लिटर रोज पाणी धरले तर आठवड्याचे ८२६ दशलक्ष लिटर इतके पाणी होते. त्याच्या १० टक्के कपात नुसार ८३ दशलक्ष लिटर पाणी वजा केले तर ७४३ दशलक्ष लिटर पाणी शहराला मिळायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात मात्र एमआयडिसीने ११२ दशलक्ष लिटर पाणी कमी दिल्याने केवळ ६३१ दशलक्ष लिटर पाणीच शहराला मिळाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात एमआयडीसी कडून १० टक्के नव्हे तर १५ टक्के पेक्षा जास्त पाणी कपात केली जात आहे.

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम

एमआयडीसी आठवड्याभरात सुमारे ८३ दशलक्ष लिटर पाणी १० टक्के प्रमाणे कमी देणे अपेक्षित आहे तसेच वेळच्या बाबतीत देखील एमआयडीसी जास्तकाळ पाणी पुरवठा खंडित करत आहे. आठवड्याभराचे तास नुसार १० टक्के कपातीचे धरले तरी सुमारे १८ तास पाणी पुरवठा खंडित राहिला पाहिजे. मात्र एमआयडीसी सलग ३६ तास पाणी बंद करत आहे.

एमआयडीसी पाणी आणि वेळेच्या बाबतीत १० टक्केव पेक्षा जास्त कपात करत असल्याने मीरा भाईंदरच्या नागरिकांना नाहक जास्त पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा तब्बल ७० ते ७५ तासांवर गेला. जेणे करून पाण्यासाठी अनेक भागात हाहाकार माजला असून दुसरीकडे खाजगी टँकर लॉबीने देखील पाणी पुरवठ्याचे दर हजार ते २ हजारांनी वाढवले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मीरा भाईंदरला किती टक्के पाणी मंजूर आहे?

    Ans: मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण कडून रोजचे ८६ तर एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे.

  • Que: रोज महापालिकेला सरासरी किती पाणी मिळते?

    Ans: रोजचे सरासरी २०२ दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला मिळते.

Web Title: Mira bhayandar midc 15 percent water suuply cut problem to people maharashtra drought 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • Maharashtra Drought 2026
  • mira bhayandar
  • water cut

संबंधित बातम्या

Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?
1

Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?

शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई अटळ! कर्जवसुली एजंटांना Eknath Shinde यांचा इशारा
2

शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई अटळ! कर्जवसुली एजंटांना Eknath Shinde यांचा इशारा

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’ एकनाथ शिंदेंचा शब्द, कर्जवसुली करणाऱ्यांना दिला सज्जड दम

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…
4

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.