Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Metro 14 Update: बदलापूर–कांजूरमार्ग मेट्रोला गती; ठाणे खाडीखालून धावणार भुयारी मार्ग

मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या मेट्रो १४ प्रकल्पाला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. बदलापूर ते कांजूरमार्ग जोडणाऱ्या या मार्गिकेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचा प्रस्ताव असून यामुळे पूर्व उपनगर, ठाणे आणि बदलापूर परिसरातील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2026 | 10:34 AM
Metro 14 Update: बदलापूर–कांजूरमार्ग मेट्रोला गती; ठाणे खाडीखालून धावणार भुयारी मार्ग

Metro 14 Update: बदलापूर–कांजूरमार्ग मेट्रोला गती; ठाणे खाडीखालून धावणार भुयारी मार्ग

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या टप्प्यात शीळफाटा ते बदलापूरदरम्यान सुमारे २५ किमी मेट्रो मार्ग विकसित होण्याची शक्यता.
  • दुसऱ्या टप्प्यात ठाणे खाडीखालून भुयारी मार्गाने कांजूरमार्गपर्यंत जोडणीचा प्रस्ताव.
  • चिखलोली येथे मेट्रो, लोकल आणि रस्ते वाहतूक जोडणारे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभारण्याची योजना.
मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांपैकी एक असलेल्या मेट्रो १४ ला नव्याने गती देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचा पर्याय समोर आला आहे. पहिल्या टप्प्यात शीळफाटा ते बदलापूर हा सुमारे २५ किलोमीटरचा मार्ग विकसित केला जाऊ शकतो. या मार्गाचा काही भाग मेट्रो १२ अ मार्गिकेसोबत समांतर राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दुसऱ्या टप्प्यात शीळफाटा ते कांजूरमार्ग या महत्त्वाच्या मार्गासाठी ठाणे खाडीखालून मेट्रो मार्ग विकसित करावा लागणार आहे. पर्यावरणीय मंजुरीसह विविध तांत्रिक प्रक्रियांमुळे या टप्प्यासाठी अधिक वेळ लागू शकतो, या प्रकल्पासाठी प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे १८,००० कोटी असून, तो पीपीपी मॉडेलवर विकसित करण्याचा विचार असल्याचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष पातकर यांनी सांगितले.

Mira Bhayandar News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम

प्रवाशांना फायदा

प्रस्तावित मार्गामुळे बदलापूर, निळजे, घणसोली, महापे आणि शीळफाटा परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक सक्षम सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. वेगाने शहरीकरण होत असलेल्या या भागांतील प्रवाशांना याचा मोठा फायदा होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

पीपीपी तत्त्वावर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न

यापूर्वी हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी तत्त्वावर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तो पर्याय यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आता अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने प्रकल्प राबवण्याचा पर्याय पुढे आला आहे.

शीळफाटा ते कांजूरमार्ग आव्हानात्मक

या, प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता, संभाव्य प्रवासी संख्या आणि तांत्रिक शक्यता यांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्याची तयारी सुरू आहे. या समितीच्या अहवालानंतर अंतिम आराखडा निश्चित केला जाईल आणि पुढील निर्णय घेतले जातील. मेट्रो १४ प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या प्रवासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पूर्व उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईदरम्यानची प्रवासी व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कसे होईल मेट्रो प्रकल्पाचे काम ?

  • इंजिनियरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन मॉडेलवर विचार केला जात आहे. जे प्रत्येक काम टप्प्यांत पूर्ण करू शकतील.
  • भुयारी मार्ग या प्रकल्पात आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार पाहायला मिळणार आहे. ही मेट्रो थेट ठाणे खाडीखालून भुयारी मार्गाने धावणार आहे.
  • चिखलोलीत इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब चिखलोली येथे एक भव्य वाहतूक
  • हब उभारले जाणार आहे. या ठिकाणी मेट्रो ५, मेट्रो १४, मध्य रेल्वेची लोकल आणि रस्ते वाहतूक एकत्र जोडली जाईल, या ४३ किलोमीटरच्या प्रवासात कांजूरमार्ग, घणसोली, महापे, शीळफाटा, निळजे ते थेट बदलापूर ही महत्वाची रेल्वे स्थानके असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

सल्लागार निवडीची प्रक्रिया सुरू

मेट्रो १४ मार्गिकेच्या प्रकल्पाच्या कामासाठी तयार करण्यात आलेला आर्थिक सुसाध्यता अहवाल, सविस्तर प्रकल्प अहवाल आणि प्रवासी संख्येचा अंदाजाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याला आधीच्या अहवालातील त्रुटी तपासून, तसेच नव्या शक्यतांची पडताळणी करावी लागणार आहे, या सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती अधिकाऱ्याऱ्यांनी दिली. कांजूरमार्ग जोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार मेट्रो १४ मार्गिकेची कांजूरमार्गला जोडणी देण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे ते म्हणाले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai metro 14 badlapur to kanjurmarg under thane creek phase wise project update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Badlapur
  • Metro

संबंधित बातम्या

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?
1

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.