ठाणे/ स्नेहा काकडे, जाधव : बौद्ध प्रतिष्ठान वाशी नवी मुंबई येथील संस्थेच्या वतीने यूपीएससी व एमपीएएससी च्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेससाठी वर्ग उपलब्ध करण्याची मागणी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्याकडे केली होती. या संस्थेचं शैक्षणिक क्षेत्रात असणार काम पाहून राजन विचारे यांनी कोणताही विलंब न लावता या संस्थेला विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लासेससाठी 30 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचे आज काम पूर्ण झाल्याने आज बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून या नवीन वर्गाचे उद्घाटन शिवसेना नेते माजी खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे, बेलापूर जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ,ऐरोली जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर ,शहर प्रमुख महेश कोटीवाले उपशहर प्रमुख अशोक सपकाळ तसेच या संस्थेचे अध्यक्ष डॉ अनंत हर्षवर्धन सचिव मधुकर साळवे खजिनदार पंडित भालेराव उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगीया संस्थेचे अध्यक्ष डॉ अनंत हर्षवर्धन यांनी या नव्याने विकसित केलेल्या वर्गात नवीन अत्याधुनिक सामग्री याचा वापर करून यूपीएससी व एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लासेस सुरू करणार आहे तसेच परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषांतर क्लासेस, राज्य शासनाच्या विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन त्याचबरोबर सैन्य भरतीचेही मार्गदर्शन या वर्गातून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. शिवसेना नेते राजन विचारे यांनी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.