पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठाच झाला खंडित; दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
Thane Water Supply In Marathi: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून ठाणे महापालिका प्रशासनाने रविवारपर्यंत शहरात 30 टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. या कालावधीत प्रत्येक विभागाचा प्रत्येकी एका दिवशी २४ तास पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. भातसा धरणाच्या न्युमॅटिक गेट सिस्टीममधील बिघाडामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी पाणी जपून वापरावं लागणार आहे. या कामामुळे ठाणे शहरातील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. त्याअंतर्गत शहरातील पाणीपुरवठा विभागनिहाय 5 दिवस 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे दुरुस्तीचे काम रविवारपासून सुरू झाले असून पुढील १५ दिवस सुरू राहणार आहे.
एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल…5 डिसेंबरचा मुहूर्त टळणार?
दुरुस्तीचे काम सुरू असताना भातसा धरणाची पाणीपातळीही कमी झाली आहे. त्यामुळे पाणी उपसण्याचे काम होत नाही. सर्व भागात एकाच वेळी पाणीपुरवठा बंद होणार नाही, यासाठी महापालिकेने वेळापत्रक जारी केले आहे. यावेळी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवार 3 डिसेंबर : माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकळी, मनोरमा नगर, रुणवळ, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबील, आनंद नगर, कासारवडवली.
बुधवार 4 डिसेंबर: गांधी नगर, सुभाष नगर, नालपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोक उपवन, MMRDA, तुळशीधाम, सूरकरपाडा, सिद्धांचल, कोकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्री नगर-1 आणि 2, मैत्री पार्क.
गुरुवार 5 डिसेंबर : सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, डॉ.बाबा साहेब आंबेडकर रोड.
शुक्रवार ६ डिसेंबर : दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेती बंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर.
शनिवार 7 डिसेंबर : राबोडी-1 व 2, आकाशगंगा, जेल टँक कॉम्प्लेक्स, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनीषा नगर, अटकोनेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर
रविवार 8 डिसेंबर : लोकमान्य पाडा-1, 2, दोस्ती, वेदांत, आकृती कॉम्प्लेक्स, अरुण क्रीडा मंडळ, मेंटल हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धरमवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णू नगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड.
भिवंडी बनले नवीन HIV हॉटस्पॉट! 90 टक्के वेश्या पॉझिटिव्ह, हे आकडे वाचून व्हाल चकित!