Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 ‘ अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा केला सन्मान

‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 ’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित समारंभात सन्मानित केलं

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 28, 2025 | 04:02 PM
ठाण्यात यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 ‘ अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा केला सन्मान
Follow Us
Follow Us:

ठाणे /स्नेहा काकडे : ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 ’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित समारंभात सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंचायत राज संस्थांना आणि गुणवंत अधिकारी/कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या वेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या अभियानांतर्गत जिल्हा परिषद, वर्धा (तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या कार्यकाळातील कामगिरीसाठी) यांना “यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2022-23” अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (₹३० लाख रक्कमेसह) प्रदान करण्यात आले.

ठाणे जिल्हा परिषदेचे गुणवंत अधिकारी व आदर्श संस्था (राज्यस्तरीय):
गुणवंत अधिकारी / कर्मचारी – सन 2022-23:
1. अविनाश फडतरे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)
2. संगीता रामकृष्ण घुरडे – सहायक लेखा अधिकारी, अर्थ विभाग

आदर्श ग्रामपंचायत अधिकारी – 2022-23:
• विलास कृष्णा मिरकुटे, ग्रामपंचायत अधिकारी, मासले, ता. मुरबाड

गुणवंत अधिकारी – 2023-24:
• अजय वामन भोंडीवले, सहायक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, शहापूर

आदर्श ग्रामपंचायत अधिकारी – 2023-24:
• विशाखा विवेक पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, वाशिंद, ता. शहापूर

अत्युत्कृष्ट विभागस्तर पंचायत समिती पुरस्कार – पंचायत समिती, शहापूर (2023-24):
गट विकास अधिकारी नम्रता जगताप व तत्कालीन गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या गौरवप्रसंगी भावना व्यक्त करताना सांगितले की, “यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत मिळालेला हा गौरव म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नाही, तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्याच्या समर्पित सेवाभावाची पावती आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायती यांचा समन्वय अत्यावश्यक आहे. ठाणे जिल्ह्यात आम्ही ‘सशक्त पंचायत – सक्षम ग्रामविकास’ या तत्वावर काम करत असून, हा पुरस्कार आमच्या कार्यपद्धतीला मिळालेली मान्यता आहे.”

या उल्लेखनीय यशामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे नाव राज्यस्तरावर गौरवाने घेतले जात आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, तसेच सर्वच स्तरातून पुरस्कारप्राप्त अधिकारी आणि विभागांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. हा सन्मान आगामी काळात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि ग्रामविकासासाठी अधिक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Officers and employees honored under yashwantrao chavan panchayat raj mission 2025 in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • latest news
  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी
1

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
2

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू
3

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू

Ulhasnagar: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी खेळाडूंना मिळाले व्यासपीठ; उल्हासनगरात डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन
4

Ulhasnagar: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी खेळाडूंना मिळाले व्यासपीठ; उल्हासनगरात डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.