Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन जवळ येताच बाजारपेठेत राख्यांची रेलचेल; कार्टून राख्यांची क्रेझ कायम

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरच्या बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. मात्र, यंदा राख्यांच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ झाल्याने खरेदीचा उत्साह काहीसा कमी दिसत आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 22, 2026 | 11:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठा सजल्या
  • ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरच्या बाजारपेठांमध्ये राख्यांची विविध डिझाइन्स उपलब्ध आहेत
  • यंदा राख्यांच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राखी खरेदीसाठी दुकानातून गर्दी दिसून येत आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी २० टक्के भावात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, बदलापूर शहरातील चौकाचौकात, भाजी मार्केट, मीना बाजारपेठ तसेच मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या संख्येने राख्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. राख्यांची विक्रीस पाहिजे तसा उत्साह दिसत नसल्याची माहिती येथील विक्रेत्यांकडे चर्चा केल्यावर समजले आहे. हिंदू संस्कृतीत बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेला मोठे महत्त्व आहे.

राखी खरेदीचा यंदा जोर कमी

यंदा नारळी पौर्णिमा २७ ऑगस्ट रक्षाबंधन २८ ऑगस्ट रोजी असून राख्या खरेदीसाठी महिलांची गर्दी मागीलवर्षीच्या मानाने कमी दिसून येत आहे. आता एक दिवस राख्या खरेदीसाठी गर्दीत खूपच वाढ होईल. अशी माहिती येथील विक्रेत्यांनी दिली.

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

लहान मुलांमध्ये कार्टूनच्या राख्यांची क्रेझ

ग्रामीण भागात तसेच टप्प्याटप्प्यावर असणाऱ्या दुकानात, हातगाडीवर राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. रेशीम धाग्यालाही महागाईची झळ पोहोचलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच बाजारपेठा विविध रंगांच्या, आकाराच्या राख्यांनी सजलेल्या पाहताना दिसत आहेत. मुलांमध्ये सध्या पब्जीचे वेड असल्यामुळे बहिणी देखील भावाला फजीच्या राख्या खरेदी करताना दिसत आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी महिलांची राख्या खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. तर काही बहीणींनी होम मेड राख्या बनविण्यावर भर दिला असून काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी पोस्टाद्वारे राख्या पाठवून भावापर्यंत राखी पोहचवत आहेत.

रक्षाबंधन म्हणजे सर्व समाजाला जोडणारा स्नेहाचा रेशमी धागा

रक्षाबंधनाचा दिवस हा आनंद देण्यासाठी वेड्या बहिणीची वेडी ही माया म्हणा. की बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक म्हणा. रक्षाबंधन म्हणजे सर्व भारतीय समाजाला जोडणारा स्नेहाचा रेशमी धागा होय. आपल्या भावाच्या हाताला शोभून दिसेल, त्याला रुचेल, आवडेल अशी राखी शोधण्यासाठी बहीण अनेक दुकानांची पायपीट करून राखी पसंत करताना दिसत आहेत. त्यातच सध्या पब्जी हा प्रत्येकाचा आवडता खेळ झाला आहे. त्या खेळाच्या चित्राची सध्या सगळीकडे मागणी असल्यामुळे यावेळी राख्यांमध्ये देखील या खेळाचे चित्र असलेल्या राख्या ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले आहे.

उल्हासनगरातील रस्ते प्रकल्पाला हायकोर्टाचा हिरवा कंदील; रखडलेल्या रस्ते बांधकामाचा मार्ग मोकळा

बाजारात गोंड्याच्या राखीपासून चांदीच्या राख्यांना जोरदार मागणी

बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यामुळे सध्या बहिणींची बाजारपेठांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. वेगवेगळ्या रंगीत आकर्षण राख्या बाजारपेठांमध्ये आलेल्या आहेत. बच्चे कंपनींना आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या राख्यांनी राख्या ही दिसून येत आहेत. १० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत राख्या बाजारात सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये काही चांदीच्या राख्या, साध्या गोंड्याच्या राख्या यांनाही चांगली मागणी आहे. बच्चे कंपनीसाठी छोटा भीम, मोटू पतलू डोरेमॉन असे विविध कार्टूनव्या राख्या मोठ्या प्रमाणात आले आहेत. विविध प्रकारच्या देवदेवतांची चित्रे असलेल्या राख्या ही लक्ष वेधत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रक्षाबंधन कधी आहे

    Ans: रक्षाबंधन शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी आहे

  • Que: लहान मुलांसाठी कोणत्या राख्यांना मागणी आहे?

    Ans: कार्टून आणि गेमिंग थीमच्या राख्यांना लहान मुलांकडून विशेष पसंती मिळत आहे.

  • Que: यंदा राख्यांच्या किमतीत किती वाढ झाली आहे?

    Ans: गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: Raksha bandhan 2026 rakhi shopping trends rakhi market in thane kalyan dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Raksha Bandhan
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी
1

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Thane News: अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘पोलिसांचं वागणं संशयास्पद’
4

Thane News: अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘पोलिसांचं वागणं संशयास्पद’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.