Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन

गणेशोत्सवात पर्यावरणपूरक विसर्जनाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दीड दिवसांच्या विसर्जनादरम्यान ठाण्यात २० हजार ७०३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले, तर तब्बल १८ हजार ६०० किलो निर्माल्य संकलित करण्यात आले. या निर्माल्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 18, 2026 | 01:45 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ठाणेकरांचा पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा विशेष उपक्रम
  • पर्यावरण संवर्धनासोबत धार्मिक परंपराही जपण्याचा प्रयत्न
 

मंगळवारी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला आहे. यावेळी ठाणेकरांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ दिल्याचे दिसून आले.

गणेशोत्सवाच्या काळात तलाव आणि जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने राबवलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी पार पडलेल्या दीड दिवसांच्या विसर्जनादरम्यान तब्बल २० हजार ७०३ गणेशमूर्तीना निरोप देण्यात आला असून, या कालावधीत पालिकेच्या वतीने तब्बल १८ हजार ६०० किलो निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. या संपूर्ण निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून सेंद्रिय खतनिर्मितीचे काम सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत यंदा निर्माल्य व्यवस्थापनाचे विकेंद्रीत नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन घाट, कृत्रिम तलाव आणि मूर्ती संकलन केंद्रांवर भाविकांनी समर्पित केलेले निर्माल्य तातडीने संकलित करून ते शहरातील तीन प्रमुख प्रक्रिया केंद्रांकडे रवाना करण्यात आले.

बायो-कंपोस्टिंग प्रकल्पात निर्माल्यावर प्रक्रिया

हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क आणि कौसा येथील मेकॅनिकल बायो-कंपोस्टिंग प्रकल्पांमध्ये शास्त्रीय पद्धतीने या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जात आहे. महापालिकेने केलेल्या आवाहनामुळे निर्माल्यामध्ये प्लास्टिक टाकण्याचे प्रमाण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कमी केले आहे. संकलित झालेल्या एकूण १८ हजार ६०० किलो निर्माल्यात ३ टक्के प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण आढळून आले. हे अविघटनशील प्लास्टिक निर्माल्यापासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेगळे केले असून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते थेट मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्रांकडे पाठवण्यात आले आहे.

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी

जलप्रदूषण टाळण्यास मदत

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे वेळीच योग्य संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया करून शास्त्रोक्त पुनर्वापर केल्यामुळे ठाण्यातील तलाव, खाडी किनारे आणि इतर जलस्रोतांचे प्रदूषण रोखून जलप्रदूषणाला आळा घालण्यास प्रशासनाला मदत होत आहे. आगामी ५. ७ आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जनावेळीही भाविकांनी निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता पालिकेच्या निर्माल्य कलशातच अर्पण करून ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Kalyan News : के. डी. रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांचा छापा; बेकायदा पार्टीप्रकरणी 7 आयोजकांवर गुन्हा, 65 तरुण-तरुणी ताब्यात

निर्माल्यापासून खतनिर्मिती

बायोकंपोस्टिंग पद्धतीने निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या बायोकंपोस्टिंग खत प्रकल्पात तब्बल १८ हजार ६०० किलो निर्माल्य जमा करण्यात आले. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार असून निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane ganesh visarjan eco friendly campaign 18600 kg nirmalya collected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’
1

Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’
2

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे
3

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव
4

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.