Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे

आज शुक्रवार, 18 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आहे. या दिवशी महाराष्ट्रातील काही कुटुंबांमध्ये मांसाहारी पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ही प्रथा सर्वत्र आढळत नसून, प्रदेश, समाज आणि कुटुंबाच्या कुळाचारानुसार तिचे स्वरूप बदलते. गौराईला मांसाहारी नैवेद्य का दाखवला जातो आणि त्यामागे कोणत्या लोकमान्यता आहेत, जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 18, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील काही कुटुंबांमध्ये गौराईला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची परंपरा
  • काही ठिकाणी मांसाहारी नैवेद्य शिवगणांसाठी असल्याची श्रद्धा
  • कोकणातील स्थानिक संस्कृतीचा गौराई पूजेवर प्रभाव
 

गौराईला मांसाहारी नैवेद्य का दाखवला जातो?

महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात गौरी किंवा गौराईचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले जाते. अनेक घरांमध्ये गौरीला साडी, फुलांची सजावट आणि विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्यामध्ये काही कुटुंबाच्या परंपरेनुसार मांसाहारी पदार्थांचादेखील समावेश असतो. यामुळे गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो, ही प्रथा सर्वत्र आहे का आणि त्यामागे कारण काय आहे, असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतात.

गौराईला मांसाहारी नैवेद्य कुठे दाखवला जातो?

गौराईला मांसाहारी पदार्थांचे नैवेद्य दाखवण्याची प्रथा नेमकी कुठे आढळते, गौराईच्या पूजेला महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही घरांमध्ये गौराईला पूर्णपणे शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो तर काही कुटुंबामध्ये कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मांसाहारी पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. विशेषतः कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये स्थानिक लोकपरंपरा, कुटुंबाची श्रद्धा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रितीरिवाजानुसार गौराईच्या नैवेद्यात मांसाहारी पदार्थांचा समावेश केला जातो. मात्र ही प्रथा सर्व महाराष्ट्रात किंवा सर्व गौरी पूजनामध्ये पाळली जाते असं नाही.

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव

मांसाहारी नैवेद्यामागची लोकमान्यता काय?

पौराणिक आख्यायिकेनुसार, गौराई ही माहेरवाशीण म्हणून येते आणि तिच्या रक्षणासाठी शिवागार सोबत येतात. हा मांसाहारी नैवेद्य थेट देवीला नसून गौरी सोबत आलेल्या शिवगणासाठी असतो अशी काहींची श्रद्धा आहे. मांसाहारी नैवेद्यामागील लोकपरंपरा नेमकं काय सांगते. काही कुटुंबामध्ये गौराईला घरची समृद्धी, अन्नधान्याची भरभराट आणि सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घरात जे अन्न पारंपरिक पद्धतीने तयार केलं जातं त्यातील काही पदार्थ देवीला अर्पण करण्याची प्रथा दिसते. मांसाहारी नैवेद्याबाबत काही ठिकाणी लोकमान्यता आढळतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे घरच्या अन्नाचा सन्मान. काही कुटुंबामध्ये देवीला केवळ गोडधोडच नाही तर घरच्या जेवणातील पारंपरिक नैवेदय ही अर्पण केले जातात. त्या कुटुंबाच्या आहार परंपरेत मांसाहारचा समावेश असल्यास तो नैवेद्याचाही भाग होऊ शकतो.

कुलाचार आणि कौटुंबिक परंपरा

दुसरं म्हणजे कुलाचार आणि कौटुंबिक परंपरा. काही प्रथा या धार्मिक ग्रंथांपेक्षा कुळाचार, स्थानिक रुढी आणि पूर्वजांपासून चालत आलेल्या श्रद्धांवर अवलंबून असतात त्यामुळे एका घरातील नैवेद्य दुसऱ्या घरांपेक्षा वेगळा असू शकतो. स्थानिक संस्कृतीचा प्रभावही यामध्ये आहे. कोकणामध्ये अनेक भागामध्ये मासे आणि इतर मांसाहारी पदार्थ हे पारंपरिक आहाराचा भाग राहिलेत त्यामुळे काही स्थानिक देवी परंपरामध्ये त्याचा नैवेद्याशी संबंध जोडला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहारी नैवेद्य दाखवण्यामागे एकच सर्वसामान्य धार्मिक कारण आहे असं ठामपणे सांगता येत नाही याप्रकारचे स्पष्टीकरण प्रामुख्याने स्थानिक लोकविश्वास आणि कुटुंब परंपरेनुसार बदलतं.

Gauri Puja: कानाकोपऱ्यात गौरीचे रूप वेगळे, महाराष्ट्रातील गौरीपूजेच्या अनोख्या परंपरा जाणून घ्या

गौराईच्या नैवेद्यात काय केले जाते?

गौराईच्या नैवेद्य़ाची परंपरा घरांनुसार बदलते. अनेक घरांमध्ये पुरणपोळी, पंचपक्क्वान्न, विविध भाज्या, कोंशिबीर, आमटी भात, लाडू आणि इतर गोड पदार्थ केले जातात. तर काही कुटुंबामध्ये पारंपरिक मांसाहारी जेवणाचा भाग म्हणून मासे, मटण किंवा चिकन यांसारखे पदार्थ नैवेद्याला ठेवले जातात. मात्र कोणता पदार्थ ठेवायचा तो कोणत्या दिवशी करायचा आणि पूजा कशी करायची हे त्या कुटुंबाच्या प्रथेनुसार ठरतं

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Gauri pujan what is the reason behind showing non vegetarian offerings to gaurai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Radha Ashtami 2026: राधाष्टमी कधी आहे? राधा-कृष्णाच्या प्रेमभक्तीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परंपरा जाणून घ्या
1

Radha Ashtami 2026: राधाष्टमी कधी आहे? राधा-कृष्णाच्या प्रेमभक्तीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परंपरा जाणून घ्या

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव
2

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…
3

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
4

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.