Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : मुंबईनंतर ठाण्यातही कोविडचे रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टमोडमध्ये

ठाणे सिव्हिल रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला असून, या ृमध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 24, 2025 | 05:04 PM
Thane News : मुंबईनंतर ठाण्यातही कोविडचे रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टमोडमध्ये
Follow Us
Follow Us:

ठाणे /स्नेहा जाधव,काकडे : जगभरातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून, पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला असून, या ृमध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत.

मुंबईत करोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील तीन रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत मात्र, संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.

देशभरात कोविडचं थैमान पुन्हा एकदा सुरु झालं. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात कोविड रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे मनपा हद्दीत देखील गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले त्याचवेळी कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

याचपार्श्वभूमीवर आता ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला आहे. हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे. याशिवाय, रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच करोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकते.शहरातील शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं, मॉल्स आणि बाजारपेठांमध्येदेखील मास्क व सॅनिटायझर वापरासंबंधी सूचना दिल्या गेल्या आहेत. सर्व संस्थांना निर्देश दिले आहेत की, लक्षणे असलेल्यांना उपस्थित राहू न देता तातडीने तपासणीसाठी पाठवावे, असं आवाहन केलं आहे.

Web Title: Thane news after mumbai covid patients in thane too health system on alert mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • covid
  • health
  • thane

संबंधित बातम्या

Badminton Tournament : टॉप सीड युविका बजाजला स्पृहा जोशीचा धक्का; हर्षित महिमकरची दुहेरी विजेतेपदाकडे वाटचाल
1

Badminton Tournament : टॉप सीड युविका बजाजला स्पृहा जोशीचा धक्का; हर्षित महिमकरची दुहेरी विजेतेपदाकडे वाटचाल

Thane Chhath Puja 2026: छठ पूजेनिमित्त ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज
2

Thane Chhath Puja 2026: छठ पूजेनिमित्त ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज

Congo Ebola Outbreak : काँगोमध्ये इबोलाचा कहर; ५,४०० हून अधिक मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमुळे नियंत्रण मोहिमेला खीळ
3

Congo Ebola Outbreak : काँगोमध्ये इबोलाचा कहर; ५,४०० हून अधिक मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमुळे नियंत्रण मोहिमेला खीळ

Thane News: जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत शेकडो मासे मृतावस्थेत; आदिवासी मच्छिमारांना मोठा फटका
4

Thane News: जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत शेकडो मासे मृतावस्थेत; आदिवासी मच्छिमारांना मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.