Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : मनपाअधिकारी, कंत्राटदार आणि विकासकांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरु ; संजय केळकरांचा गंभीर आरोप

शेकडो कोटींचा घोटाळा ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कंत्राटदार आणि विकासकांच्या संगनमताने केल्याचा धडधडीत आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 15, 2025 | 06:18 PM
Thane News : मनपाअधिकारी, कंत्राटदार आणि विकासकांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरु ; संजय केळकरांचा गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे – म्हाडाच्या सदनिका लाटल्या, एअर फोर्स स्टेशन क्षेत्रात नियम डावलून बहुमजली इमारती, एकाच रस्त्यासाठी तीनवेळा कंत्राटे, शासकीय जागेवर टीडीआर अशा अनेक प्रकरणांतून शेकडो कोटींचा घोटाळा ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कंत्राटदार आणि विकासकांच्या संगनमताने केल्याचा धडधडीत आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. या प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी अधिवेशनात केली.

ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असल्याने त्या तुलनेत नागरिकांना पुरेशा सुविधा मिळाव्यात, नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यात याव्यात यासाठी राज्य शासनाकडून आठ हजार कोटींचा निधी आणण्यात आला, मात्र काही अधिकारी आणि विकासक, कंत्राटदार यांच्या संगनमताने कोट्यवधीची लूट झाली असून तीन हजार कोटींचा हिशोबच लागत नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला.

चार हजार चौ. मि.पेक्षा जास्त क्षेत्रफळावर गृहप्रकल्प होत असतील तर विकासकांना २० टक्के अधिक सदनिका बांधुन म्हाडाला हस्तांतरीत करणे आवश्यक आहे. शहरात अशा ८०२ सदनिका हस्तांतरित करणे आवश्यक असताना यातील फक्त २३० सदनिका हस्तांतरित करण्यात आल्या तर उर्वरित सदनिका विकासकांनी परस्पर विकल्या. यातील एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी सर्वच प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल व्हायला हवा. विशेष म्हणजे म्हाडा आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही कारवाई करण्यात स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे या प्रकरणात संगनमताने शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला.

कोलशेत येथे एअर फोर्स स्टेशन असून हे क्षेत्र संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. मात्र शहर विकास विभागाने या भागात नियम डावलून विकासकाला बांधकामाची परवानगी दिल्याने येथे आठ-आठ मजल्याच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत, त्यामुळे या स्टेशनच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याची बाबही श्री.केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. सेक्टर पाचमधील या बांधकामांना स्थगिती देऊन कारवाई करणार का? अस प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शासकीय जागेवर टीडीआर दिला जात नाही, पण ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विकासकाला टीडीआर दिला असून बिल्डरने तो विकूनही टाकल्याचा आरोप संजय केळकर यांनी केला आहे. याची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.ठाणे महापालिकेतील काही अधिकारी उर्मट, बेजबाबदार असून ठाणेकरांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवतात. अधिकारी, विकासक आणि कंत्राटदारांच्या संगनमताने शासनाच्या निधीची लूट सुरू असून याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, असा प्रश्न आमदार केळकर यांनी सभागृहात उपस्थित केला.

अधिवेशनात आरोपांची जंत्री

शीळ दिवा या ४.२ किमी रस्त्याचे तीनवेळा कंत्राट देऊन १७० कोटीहून अधिक निधीचा अपहार करण्यात आला आहे.

विकास आराखड्याचे काम सुरू असून जुन्या माजी अधिकाऱ्यांना बसवून विकासकधार्जिणा गैरकारभार केला जात आहे. या आराखड्याला मंजुरी मिळू नये. त्याची चौकशी करण्यात यावी.

पाच वर्षांचे लेखा परीक्षण करण्यात आलेले नसून त्याची चौकशी करण्यात यावी.

प्रत्यक्ष गुंतवणूक ५८८.५७ कोटी झाली असून लेखा परीक्षण अहवालात ७०.५४ कोटी दाखवण्यात आले आहेत. ५१७ कोटींपेक्षा अधिक निधीचे योग्य दस्तऐवजीकरण झालेले नसल्याने लेखा परीक्षण अहवाल सादर केला जात नाही.

Web Title: Thane news corruption worth crores of rupees has started by municipal officials contractors and developers sanjay kelkar makes serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक
1

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक

Mira Bhayander News : उत्तन विकास आराखड्यावर हरकतींसाठी ग्रामस्थांची मुदतवाढीची मागणी
2

Mira Bhayander News : उत्तन विकास आराखड्यावर हरकतींसाठी ग्रामस्थांची मुदतवाढीची मागणी

Ahilyanagar :  एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम नकाशे, व्याप्ती उपलब्ध; आयुक्तांनी दिली माहिती
3

Ahilyanagar : एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम नकाशे, व्याप्ती उपलब्ध; आयुक्तांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.