Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : युद्धजन्य परिस्थितीत जिल्हा प्रशासन सज्ज! सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 10, 2025 | 05:34 PM
Thane News :  युद्धजन्य परिस्थितीत जिल्हा प्रशासन सज्ज! सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सुरक्षित निवारागृहांची निवड करून ती सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्याचे तसेच नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले. यासोबतच सायरनची नियमित तपासणी करणे, जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करणे यावर त्यांनी विशेष भर दिला.

आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात सामाजिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, त्यांच्याशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. जीवनावश्यक वस्तू व साहित्याची यादी तयार करून पुरवठादारांची माहिती अद्ययावत ठेवण्यासोबतच, आपल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

आता प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची वेळ आहे. देशासाठी आणि समाजासाठी एकजुटीने काम करण्याची ही वेळ आहे. सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून पूर्ण तयारी करावी. जशी वेळ येईल, तसे आपले कर्तव्य बजावण्यासाठी मागेपुढे पाहू नका,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. त्यांनी पुढे सांगितले की, सर्वांना रजेवरून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून, आता ही आपल्या सर्वांच्या ‘परीक्षेची वेळ’ आहे, त्यामुळे प्रत्येकाने सर्व प्रकारे सज्ज राहावे.

या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी आपापल्या विभागाच्या तयारीबाबत माहिती दिली आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या बैठकीस अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सुनील पवार, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, सर्व प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव, महानगरपालिकांचे उपायुक्त, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, भारतीय भू-सेना व वायुसेनेचे प्रतिनिधी अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.एकंदरीत, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतलेली ही तातडीची बैठक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

Web Title: Thane news district administration ready for war like situation district collector orders to keep all systems up to date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • india pakistan war
  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
1

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
2

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
3

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना
4

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.