Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : हिंदी मराठी वाद संपता संपेना! तिसरी इयत्तेतील हिंदीच्या पेपरला मनसेची शाळेवर धडक

हिंदी मराठी वाद संपता संपेना अशी स्थिती सध्या होत आहे. अशातच आता तिसरी इयत्तेतील हिंदीच्या पेपरला मनसेची शाळेवर धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय, वाचा सविस्तर ...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 05, 2025 | 06:33 PM
Thane News : हिंदी मराठी वाद संपता संपेना! तिसरी इयत्तेतील हिंदीच्या पेपरला मनसेची शाळेवर धडक
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : हिंदी मराठी वाद संपता संपेना अशी स्थिती सध्या होत आहे. महाराष्ट्रात मराठी माणसावर हिंदी सक्ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. याचपार्श्वभूमीवर शालेय शिक्षणात देखील हिंदी सक्ती चालू देणार नाही असं देखील सांगण्यात आलं होतं. अशातच आता दिव्यातील कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल या शाळेत आज तिसरीच्या विद्यार्थ्यांचा हिंदी भाषेचा पेपर असल्याची माहिती मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांना मिळाली. याबाबत खातरजमा केल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेवर धडक देऊन शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला आहे.

इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याच्या निर्णय शासनाने रद्द केलेला असतानाही अशा प्रकारच्या कुठल्याही शासन निर्णयाची माहितीच नसल्याचे धक्कादायक विधान शाळा व्यवस्थापकांनी केले आहे. दिव्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जात असल्याबाबतचे पत्र बुधवारी मनसे नेते अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले होते. अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती.

मनसेच्या विरोधानंतर संबंधित शाळेने १ ली ते ४ थी पर्यंतची हिंदी विषयाची परीक्षा तात्काळ स्थगित केली असून भविष्यात अशा प्रकारे कुठलीही कृती करणार नाही, अशी लेखी हमी शाळेने दिवा मनसेला दिली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष शरद पाटील, उपविभाग अध्यक्ष सुशांत तांडेल, शाखाध्यक्ष सागर निकम, धनेश पाटील, महादेव पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शाळा सुरू असताना दुपारच्या वेळी दिव्यातील मनसे पदाधिकारी येऊन त्यांनी तिसरीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ नये असे सांगताच आम्ही ती थांबवली. तसेच १ ली ते ४ च्या विद्यार्थ्यांना यापुढे आम्ही हिंदी शिकवणार नाही, हे मी मनसे पदाधिकारी यांना पत्रा द्वारे लिहून दिले, असं कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक, नेहा तिवारी यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: Thane news hindi marathi controversy is not over mns attacks school over third standard hindi paper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • MNS
  • Thane news

संबंधित बातम्या

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
1

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
2

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली
3

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश
4

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.