Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane : शिवसेनेच्या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर; उभारणार गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती

शिवसेना ठाकरे गट आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही ठाण्यातील मासुंदा तलाव जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरु होणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2025 | 05:03 PM
Thane : शिवसेनेच्या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर; उभारणार गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे / स्नेहा काकडे :  चैत्र महिना सुरु झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्रोत्सवाचे. यंदाचे ३० वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलाव जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरु होणार आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात “गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती” उभारण्यात आली आहे. शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडवा रविवार दि. ३० मार्च ते रामनवमी दि ६ एप्रिल पर्यंत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे.

भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे. या देवीचा आगमन सोहळा रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता कळवा येथून वाजत गाजत होणार आहे. यावेळी ३०० जणांचे लेझीम पथक जय्यत तयारीत आहे. तसेच संपूर्ण ठाणे जिल्हयातून वारकरी सांप्रदायाचे वारकरी, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझीमपथक, घोडेस्वार, मावळे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नवरात्र उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात सुप्रसिध्द प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वे.शा.सं.मुकुंदशास्ञी मुळे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. या नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची देवी भक्तांना मेजवानी अनुभवता येणार आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती

चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवित आहेत. या मंदिराची उंची ७० फूट असणार आहे. देवीचा सभा मंडप २४×२४ फुटाचा असणार आहे. तसेच सजावटीचा एक भाग म्हणून १० X ४ श्री रामांची प्रतिकृती, १० X ४ श्री हनुमानाची प्रतिकृती तसेच २५X१५ आकारमानाचे श्री राम मंदिराची प्रतिकृती फुटपाथलगत श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान समोर, मासुंदा तलाव कॉर्नर, जांभळी नाका, ठाणे येथे तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात येणार आहेत.

Web Title: Thane shiv senas navratri festival marks hindu new year with an ocean of devotion replica of ganpatipule temple to be erected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • Shiv Sena UBT
  • thane

संबंधित बातम्या

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास
1

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.