'या' भागात 2 दिवस पाणी पुरवठा बंद, नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य-X)
Thane Water Supply Cut news in marathi: ठाणेकरांना दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. कारण जलवाहिनीच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी रात्रीपासून मुंब्रा, दिवा, कळवस या भागात २४ तास पाणी येणार नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आल. परिणामी ठाणेकरांना पुढील 2 दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत बारवी ग्रॅव्हिटी कन्व्हेयर कटिंग नाका ते मुकुंदपर्यंत जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवार, 26 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 ते शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बंद कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दिवा, मुंब्रा (विभाग क्र. 26 व 31 मधील काही भाग वगळता) आणि कळवा विभाग समितीचे सर्व भाग आणि वागळे प्रभाग समिती अंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरू नगर आणि मानपाडा विभागीय समिती अंतर्गत येणाऱ्या कोलशेत खालचा गावातील पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ८५ एमएलडी पाणी मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता १० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.