या लाडक्या बहिणींना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता; मोठं कारण आलं समोर
मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करण्यात आला. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी लाडका भाऊ म्हणून स्वतःचा चांगलाच प्रचार केला. तसेच निवडणून आल्यानंतर प्रत्येक बहिणीला 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र निकालानंतर अद्याप पैसे न दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हफ्त्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता कधी दिला जाईल याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेच्या पुढील हफ्त्याबाबत थेट माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता हा याच आठवड्यामध्ये दिला जाईल असे वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील सर्व भगिनींना आता वर्षांअखेरी राज्य सरकारकडून पुढील हप्ता मिळणार आहे. डिसेंबर महिन्याचा योजनेचा हफ्ता आजपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महायुती सरकारकडून यापूर्वी देखील लाडकी बहीण योजनेचे पाच हफ्ते देण्यात आले आहे. दर महिना 1500 असे 7500 रुपये प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. त्याचबरोबर निवडणूका असल्यामुळे आणि दिवाळी असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता देण्यात आला होता. प्रचारावेळी याचा जोरदार प्रचार देखील करण्यात आला. आता लाडक्या बहीण योजनेचा सहावा हफ्ता डिसेंबर महिन्यामध्येच दिला जाणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या हालचाली देखील सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नुकतेच राज्याचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन देखील पार पडले. यावेळी देखील लाडकी बहीण योजनेच्या पुढील हफ्त्यांवरुन राजकारण रंगले आहे. आता हिवाळी अधिवेशनानंतर राज्य सरकारने योजनेचा हफ्ता देण्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पुन्हा सरकार आल्यावर 2100 रुपये दरमहा दिले जातील असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये 2100 रुपये येण्याची आशा बहिणींना होती. मात्र भगिनींना 1500 रुपये दर महिना दिले जाणार आहेत. राज्य सरकारचे पुढील अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर 2100 रुपये दरमहिना योजनेचा हफ्ता दिला जाणार आहे. सध्या तरी योजनेचा 1500 रुपये दिले जाणार असून दोन टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यांमध्ये 2 कोटी 35 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता दिला जाणार आहे.
महाविकास आघाडीची जोरदार टीका
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी विजय मिळाल्यानंतर अद्याप पैसे न दिल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. कॉंग्रेसच्या नेत्या व सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुतीवर निशाणा साधला. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “लाडकी बहीण आता सावत्र झाली का? हा चुनावी जुमला होता, हेच आता समोर आलं. सोलापूरला मंत्रीपद मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. भाजपचं इथलं नेतृत्व सक्षम काम करत नाही. म्हणून कदाचित सोलापूरला मंत्रिपद मिळालं नसावं. पण लक्षात ठेवा मी सोलापूरची खासदार आहे. नोटबंदी सारखे निर्णय हे असंविधानिक होते. भाजपच्या काळात अघोषित आणीबाणी आहे,” अशी भाजपावर प्रणिती शिंदे यांनी टीका केली होती.