Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमध्ये खड्ड्यांविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन, खड्ड्यात रांगोळ्या काढत व्यक्त केला निषेध

कल्याण शहर युवक काँग्रेसच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. शहाड पुल परिसरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये बसून या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 14, 2024 | 05:57 PM
कल्याणमध्ये खड्ड्यांविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन, खड्ड्यात रांगोळ्या काढत व्यक्त केला निषेध

कल्याणमध्ये खड्ड्यांविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन, खड्ड्यात रांगोळ्या काढत व्यक्त केला निषेध

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सवाला अवघा एक महिना राहिला असून अद्यापही शहरांतील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाही. उलट या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे शहरात दोन दोन तास वाहतूक कोंडी होत असल्याविरोधात आज युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. येथील शहाड पुल परिसरात युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन करत येथील खड्ड्यात रांगोळ्या काढत प्रशासनाचा निषेध केला. तर चुकून रस्ता दिसला तर दचकू नका, पुढे खड्डे आहेत..,अशी बॅनरबाजी करण्यात आली. या अनोख्या बॅनरबाजीने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले होते.

कल्याण डोंबिवलीतील अंतर्गत आणि प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळणी झाली असून नागरिक तर मेटाकुटीला आले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज तास न तास वाहतूक कोंडी होण्यासह नागरिकांना मणक्याचे आजारही झाले आहेत. परंतु त्यानंतरही गेंड्याच्या कातडीचे केडीएमसी प्रशासन अजिबात त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. याच पार्श्वभूमीवर आज (14 ऑगस्ट) कल्याण शहर युवक काँग्रेसच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. शहाड पुल परिसरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये बसून या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.

जनतेचे हाल होत असूनही केडीएमसी प्रशासनाला त्याचे काही देणेघेणे नसल्याचे सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला. तर खड्डे बुजविण्यासाठी 22 कोटींचे टेंडर केडीएमसीने पास केले आहे. खड्डे बुजविण्यासाठी आणलेल्या मशीन धूळखात पडून आहेत. यासंदर्भात नितीन गडकरी सांगतात मी 10 लाख करोड, 15 लाख करोडचे हायवे बनवतो. पण या हायवेला जायला रस्ता नाही. कल्याणला येणारे जाणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी दिला आहे.

यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी विवेक यगवल, कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी, राकेश मुथा, लालचंद तिवारी, अरुण वायले, वैशाली वाघ, लता जाधव, शेखर पोटे, अमित म्हात्रे, वर्षा रसाळ, भूषण बेंद्रे, रोहित कदम, ब्लॉक अध्यक्ष प्रवीण साळवे, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Youth congress protest against potholes in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 05:57 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news
  • youth congress

संबंधित बातम्या

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪
1

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
2

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
3

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
4

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.