पुणे: शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असून, यासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या अगोदर अकरावीसाठी एक बनावट संकेतस्थळ कार्यरत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता होती. https://mahafyjcadmissions.in/ या नवीन संकेतस्थळाच्या माध्यमातून १५ मेपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करणे अपेक्षीत होते. ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी झाली नाही, त्यांना शेवटचा एक दिवस (१६ मे ) वाढवून देण्यात आला होता.नवे संकेतस्थळ ९ मेपासून कार्यान्वित करण्यात आले आहे.
दहावीचा निकाल १३ मे ला जाहीर झाला आहे.या वर्षी अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १९ ते २८ मे या कालावधीत नोंदणी करावी.असे शिक्षण संचालक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. गेल्यावर्षीपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या पाच विभागांतील अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात होती.र्वरित राज्यात पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरच प्रवेश देण्यात येत होते. मात्र, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्वत्रच अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया केल्याचे फायदे
१) सुलभता:
विद्यार्थी कुठेही आणि केव्हाही अर्ज करू शकतात – फक्त इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक.
२)पारदर्शकता:
प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्यामुळे कोणताही पक्षपात किंवा गैरव्यवहार टाळता येतो.
३)वेळ आणि खर्च वाचतो
कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो.
४)प्रणालीद्वारे मार्गदर्शन:
वेबसाइटमध्ये आवश्यक माहिती, सूचना आणि सुधारणा वेळोवेळी मिळतात.
विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार कॉलेज निवडू शकतात आणि बदलही करू शकतात.
६)दस्तऐवज अपलोड सुलभ
मूळ कागदपत्रांची फोटोकॉपी घेऊन जाण्याची गरज नाही – स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करता येतात.
७)एकाच पोर्टलवर सर्व माहिती
एकाच ठिकाणी अर्ज, कॉलेज माहिती, वेळापत्रक, फेऱ्यांचे निकाल – सर्वकाही उपलब्ध असते.
८) आपोआप गुणवत्ता यादी
गुणांनुसार प्रवेश निश्चित केला जातो – त्यामुळे निकोप स्पर्धा आणि न्याय्य संधी मिळते.