Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला

संजय भीमाशंकर थोबडे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याच्या कलम ४१-ड अन्वय केलेला अर्ज पुणे विभागाचे सह आयुक्त राहुल मामू यांनी नुकताच फेटाळला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 24, 2025 | 06:06 PM
सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला

सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर/ शेखर गोतसुर्वे : अनेक आरोप करून विश्वस्त मंडळ बरखास्त करावे अशी मागणी करणारा संजय भीमाशंकर थोबडे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याच्या कलम ४१-ड अन्वय केलेला अर्ज पुणे विभागाचे सह आयुक्त राहुल मामू यांनी नुकताच फेटाळला आहे. ट्रस्टचे नियमन करताना विश्वस्तांच्या हातून घडलेल्या काही कृती या ट्रस्टचे जाणीवपूर्वक नुकसान करणाऱ्या तसेच विश्वस्तांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी हेतुपूर्वक केल्या नसतील आणि तत्कालीन परिस्थितीनुसार ट्रस्टच्या उद्दिष्ट प्राप्ती साठी काही निर्णय घ्यावे लागले असतील तर त्यासाठी विश्वस्त मंडळ बरखास्तीसारख्या टोकाच्या निर्णयाची आवश्यकता नसून, सुधारात्मक उपाय करण्याचे निर्देश देणे आवश्यक आहे, अशी मार्गदर्शक तत्वे या निकालामध्ये अधोरेखित केली आहेत.

योगीकुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर हे महादेवाचे अवतार! सोन्नलगी म्हणजे सोलापूर ही श्री सिद्धरामेश्वरांची तपोभूमी व कर्मभूमी होय. महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी मकरसंक्रांतीच्या वेळी होणारी गड्डा यात्रा ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपाशीर्वादाने स्थापन झालेली श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी ही धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात गेली 140 वर्षापासून उत्तम व पारदर्शक लोककल्याणकारी व समाजपोयोगी कार्य करणारी संस्था आहे. अशा या महत्वाच्या धार्मिक ट्रस्टचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह सुमारे पस्तीस विश्वस्तांना बरखास्त करावे, अशी प्रमुख मागणी करणारा संजय थोबडे यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याचबरोबर या विश्वस्त मंडळातील नेमणुकांबद्दलचे सर्व बदल अर्ज एक वर्षाच्या आत निकाली काढण्याचे आदेश सोलापूर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले असून, या आदेशामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निरीक्षक नियुक्त करून दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

गेल्या सुमारे पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये धर्मराज कडादी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाने या धार्मिक ट्रस्टद्वारे सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीबांसाठी वैद्यकीय सेवा देणारे हॉस्पिटल, कर्करोग उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा, मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र अभियांत्रिकी महाविद्यालये, सर्व माध्यमांच्या शाळा तसेच सिद्धेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. पुर्णतः जीर्ण झालेल्या व भाविकांच्या जीवितास धोकादायक असलेल्या जुन्या सभा मंडपाचे नूतनीकरण करणे, तलाव सुधारणा समितीच्या माध्यमातून मंदिराच्या सभोवताली सुमारे पस्तीस एकर क्षेत्रात असलेल्या विस्तीर्ण तलावाचे सुशोभीकरण व डागडुजी करणे, भाविकांसाठी विविध सुविधा करणे अशा मंदिर परिसरातील बांधकाम करताना या कालावधीत प्रसंगानुसार ट्रस्टच्या उद्दिष्टपूर्ती तसेच भाविकांच्या सोयीसाठी काही तातडीचे निर्णय घेवून काम करावे लागले होते. ही कामे करत असताना त्यास आवश्यक असलेल्या परवानगी देताना महानगरपालिकेने दंड आकारला म्हणून विश्वस्त मंडळ बरखास्त करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. वास्तविक पाहता या कालावधीमध्ये अर्जदार संजय थोबडे हे सुद्धा एक विश्वस्त होते. या सर्व घडामोडींची माहिती त्यांना पण होती. त्यावेळेस त्यांनी कोणतीही हरकत घेतली नव्हती.

परंतु काही कारणास्तव संजय थोबडे यांच्या वैयक्तिक मागणीवरून अध्यक्ष काडादी आणि इतर विश्वस्तांसोबत वादंग झाले. त्याची परिणीती म्हणून थोबडे यांनी सर्व विश्वस्तांचा अवमानकारक भाषा वापरून अपमान केला. मंदिर परिसरातील ट्रस्टच्या कार्यालयात जाऊन आरडाओरडा व शिवीगाळ करून कर्मचाऱ्यांना धमकावून कागदपत्रांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करून ट्रस्टच्या कामकाजात अडथळा निर्माण केला. त्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा देण्याची संधी दिली असता त्यांनी परत विश्वस्त मंडळ सभेमध्ये गोंधळ घातला. त्यामुळे १८ जून २०१८ रोजी झालेल्या बैठकीमध्ये संजय थोबडे यांना विश्वस्त पदावरून काढण्यात आले. विश्वस्त म्हणून त्यांचे नाव कमी करण्याचा बदल अहवाल सोलापूर धर्मादाय कार्यालयात दाखल झाल्यावर त्याची प्रतिक्रिया म्हणून थोबडे यांनी लगेचच सर्व विश्वस्त मंडळ बरखास्ती साठी पुणे विभागीय धर्मादाय कार्यालयाकडे अर्ज केला होता.

न्यायालयीन निर्णयामुळे सत्याचा विजय झाला असून, श्री सिद्धेश्वर देवस्थान,सोलापूरच्या कार्यपद्धतीवर व विश्वस्त मंडळावर असलेला भाविकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. हे देवस्थान कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर सर्व भाविकांच्या श्रद्धा, सेवा व सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत आहे. भविष्यातही पारदर्शक व प्रामाणिक कार्यातून श्री सिद्धेश्वर चरणी अखंड सेवा घडत राहील. या सपुंर्ण प्रक्रिया काळात देवस्थानवर विश्वास ठेवून संयम राखणाऱ्या सर्व भाविकांचे मी मनापासून आभार मानतो. – धर्मराज काडादी (अध्यक्ष, श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट, सोलापूर)

सह धर्मादाय आयुक्त राहुल मामू यांनी अर्जातील सर्व मुद्यांवर दाखल कागद पत्रांच्या आधारे सविस्तर सुनावणी घेऊन आणि दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यावर ट्रस्टच्या मिळकतीमधून विश्वस्त मंडळाने स्वतःला काहीही लाभ व्हावा यासाठी कोणताही हेतुपूर्वक निर्णय घेतला नसल्याचा आणि ट्रस्ट मिळकतींचे नुकसान झाले नसल्याचा निष्कर्ष काढून थोबडे यांचा अर्ज फेटाळला. सिद्धेश्वर देवस्थान आणि विश्वस्तांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांच्यासह ॲड. विश्वनाथ आळंगे, ॲड. किरण कनाळे, ॲड. माधुरी थोरात व ॲड. श्रद्धा मोरे यांनी काम पाहिले.

विश्वस्तांवर केवळ दंडात्मक कारवाई करणे हे धर्मादाय आयुक्तांचे कार्य नसून, विश्वस्तांनी घेतलेले निर्णय न्यासाच्या हिताचे दृष्टीने योग्य असतील तर धर्मादाय संस्थांचे ‘पालक अधिकारी’ म्हणून त्यातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश देवून न्यासाचा कारभार सुरळीत ठेवता येईल हे या निकालाने स्पष्ट केले आहे. – ॲड. शिवराज कदम जहागिरदार, (श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळातर्फे वकील)

 

Web Title: The application seeking the dissolution of the board of trustees of siddheshwar devasthan has been rejected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Solapur News

संबंधित बातम्या

Shivsena : शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा,प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार
1

Shivsena : शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा,प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार

आंदेकर कुटुंबातील सदस्याला निवडणूकीत तिकिट देऊ नका; आयुष कोमकरच्या आईचे भावनिक आवाहन
2

आंदेकर कुटुंबातील सदस्याला निवडणूकीत तिकिट देऊ नका; आयुष कोमकरच्या आईचे भावनिक आवाहन

ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
3

ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

‘दादां’च्या भुमिकेमुळे मविआला बळ? मनोमिलनाच्या शक्यतेने वाढली रंगत
4

‘दादां’च्या भुमिकेमुळे मविआला बळ? मनोमिलनाच्या शक्यतेने वाढली रंगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.