Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जलविहाराचा आनंद घेण्यासाठी जात असतानाच दुर्घटना; समुद्रात बोटच बुडाली

प्रसंगावधान आणि धाडस दाखवत या चौघांनी एकामागोमाग एक 16 तरुणांना बुडताना वाचवले. एकेक करत सर्वांना बाहेर काढत त्यांनी खऱ्या अर्थाने देवदूतांची भूमिका बजावली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2025 | 07:17 AM
जलविहाराचा आनंद घेण्यासाठी जात असतानाच दुर्घटना; समुद्रात बोटच बुडाली

जलविहाराचा आनंद घेण्यासाठी जात असतानाच दुर्घटना; समुद्रात बोटच बुडाली

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी : रनपार येथील समुद्रात उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांचा जलविहार त्यांच्याच जीवावर बेतला असता. रनपार समुद्रात 16 तरुणांना फिरण्यासाठी घेऊन गेलेली नौका दुपारच्या सुमारास समुद्रात उलटली. या बोटीतील सर्वांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, फिनोलेक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बुडालेल्या सर्व जणांचे जीव वाचवण्यात यश आले.

पावस येथून ‘सरस्वती’ नावाची एक खासगी बोट 16 तरुणांना घेऊन समुद्र सफरीसाठी निघाली होती. फिनोलेक्स केमिकल जेटीजवळ आल्यानंतर अचानक समुद्राला मोठमोठ्या उसळणाऱ्या लाटांमुळे बोटीतील हास्य अचानक किंकाळ्यांमध्ये बदलले. समुद्र खवळलेला होता, वाऱ्याचा जोर वाढला आणि बोटीत क्षमतेपेक्षा अधिक जण असल्याने ‘सरस्वती’ बोट एका क्षणात पलटी झाली. बोटीतले सर्व 16 तरुण समुद्रात पडले आणि क्षणात जीव धोक्यात आला.

कर्मचाऱ्यांची प्रसंगावधानता

‘अल फरदिन’ नावाच्या बोटीवर कार्यरत असलेले तांडेल फरीद आणि ‘सिल्वर सन’ पायलट बोटीवर ड्युटीवर असलेले, एचसी मुजावर, एमएसएफ जवान विजय वाघने, तसेच अपूर्व जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतला. प्रसंगावधान आणि धाडस दाखवत या चौघांनी एकामागोमाग एक 16 तरुणांना बुडताना वाचवले. एकेक करत सर्वांना बाहेर काढत त्यांनी खऱ्या अर्थाने देवदूतांची भूमिका बजावली.

सरस्वती बोट समुद्रात बुडाली

बचावलेल्या तरुणांमध्ये केतन आडविलकर, मयुरेश वरवटकर, महंत खडपे, ध्यानेश्वर डोळेकर, आर्यन वरवटकर, श्रेयस वरवटकर, कुणाल डोरलेकर, स्वानंद वरवटकर, अथर्व नाचणकर, साई वाडेकर, सुमित बोरकर, गौरंग सुर्वे, ओम सुर्वे, अथर्व सुर्वे, रुद्र सुर्वे यांचा समावेश होता. सर्व तरुण सुखरूप बाहेर पडल्यावर त्यांना पूर्णगड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, ‘सरस्वती’ बोट ही पूर्णतः समुद्रात बुडाली.

Web Title: The boat sank in the sea incident in ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 07:17 AM

Topics:  

  • Boat Accident
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri News : परशुराम घाटासाठी नव्याने उपाययोजनांचा प्रस्ताव; शिवेंद्रसिंहराजेंचा पाहणी दौरा
1

Ratnagiri News : परशुराम घाटासाठी नव्याने उपाययोजनांचा प्रस्ताव; शिवेंद्रसिंहराजेंचा पाहणी दौरा

Ratnagiri news: भाचा प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता मामाने केला खून
2

Ratnagiri news: भाचा प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता मामाने केला खून

Ratnagiri News : स्मार्टवीजमीटर प्रकरणी काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक; ग्राहकांची संमत्ती नसतानाही मीटर बसवल्याचा आरो
3

Ratnagiri News : स्मार्टवीजमीटर प्रकरणी काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक; ग्राहकांची संमत्ती नसतानाही मीटर बसवल्याचा आरो

Ratnagiri News :  शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यशाळा: कात्रोळीत आधुनिक शेतीचे गिरवले धडे
4

Ratnagiri News : शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यशाळा: कात्रोळीत आधुनिक शेतीचे गिरवले धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.